Nitish Kumar : नितीश कुमारांनी जाहीर केली संपत्ती; सचिवालयाच्या संकेतस्थळावर मंत्र्यांचीही मालमत्ता प्रसिद्ध

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली एकूण संपत्ती १.६४ कोटी रुपयांची असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केले आहे.
Nitish Kumar
Nitish Kumarsakal
Updated on

पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली एकूण संपत्ती १.६४ कोटी रुपयांची असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केले आहे. नितीशकुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळ सचिवालय विभागाच्या संकेतस्थळावर रविवारी संध्याकाळी आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला.

त्यांच्या मालमत्तेत दिल्लीतील द्वारका भागातील अपार्टमेंटचा समावेश असून त्यांनी २००४ मध्ये १३.७८ लाखांना घेतलेल्या अपार्टमेंटचे मूल्य आता १.४८ कोटींवर गेले आहे. गेल्या वर्षी नितीशकुमारांनी आपली एकूण संपत्ती ७५.५३ लाखांची असल्याचे जाहीर केले होते.

Nitish Kumar
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक; नागपूरमध्ये पोलिसांनी अनेकांना घेतलं ताब्यात

मात्र, दिल्लीतील या अपार्टमेंटच्या उल्लेखामुळे त्यांच्या संपत्तीत यावर्षी वाढ होऊन ती १.६४ कोटींवर गेली आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळातील सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आपली संपत्ती जाहीर करणे नितीशकुमार सरकारने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, नितीशकुमार व त्यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांकडून आपली संपत्ती जाहीर करण्यात आली.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आपली संपत्ती ४.७४ लाख रुपये असल्याची माहिती दिली आहे. त्यांचे मोठे भाऊ व मंत्री तेजप्रताप यांची संपत्ती ३.५८ कोटी रुपये आहे.

Nitish Kumar
Teacher Recruitment: शिक्षक भरतीच्या लढ्यात वनमंत्र्यांची उडी! अभियोग्यताधारकाला थेट कॉल, शिक्षणमंत्र्यांसोबत विशेष बैठक

नितीशकुमारांची संपत्ती

  • दिल्लीतील अपार्टमेंट १.४८ कोटी

  • रोख रक्कम २२,५५२ रुपये

  • बॅंकेतील ठेवी ४९,२०२ रुपये

  • फोर्ड इकोस्पोर्ट कार ११.३२ लाख

  • सोन्याच्या दोन व चांदीची एक रिंग १. २८ लाख

  • १३ गाई, १० वासरे १.४५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.