HD Devegowda : ..म्हणून 'इंडिया' आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव नाकारला अन् भाजपसोबत..; माजी पंतप्रधानांनी सांगितलं 'हे' कारण

नितीशकुमार यांनी धजदला ‘इंडिया’ आघाडीमध्येही सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.
Bihar CM Nitish Kumar India Alliance HD Deve Gowda
Bihar CM Nitish Kumar India Alliance HD Deve Gowdaesakal
Updated on
Summary

'मी ९१ वर्षांचा आहे. आणि या वयात आपल्याला कोणतेही प्रयोग करायचे नाहीत.'

बंगळूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे त्यांच्या संयुक्त जनता दलमध्ये विलीनीकरण करून विरोधी ‘इंडिया’ आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो नाकारण्यात आल्याचे धजदचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी सांगितले.

Bihar CM Nitish Kumar India Alliance HD Deve Gowda
Bhaskar Jadhav : राज्यात 8 महिन्यांत 9 ठिकाणी जातीय दंगली, या मागं भाजपचाच हात; आमदार जाधवांचा गंभीर आरोप

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेगौडा म्हणाले की, नितीशकुमार यांनी सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी जनता दलाच्या विविध गटांसह, धजद-संजद आणि समाजवादी पक्षांची ‘जनता स्वातंत्र्य आघाडी’ स्थापन करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. व आपल्याला त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

Bihar CM Nitish Kumar India Alliance HD Deve Gowda
Uday Samant : 'मी वाघनखांच्या जवळ होतो, तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून अंगावर..; सामंतांनी सांगितला थरारक अनुभव

नितीशकुमार यांनी धजदला ‘इंडिया’ आघाडीमध्येही सामील होण्याचे निमंत्रण दिले होते. भाजपसोबत युती केल्याच्या दोन आठवड्यांनंतर देवेगौडा यांनी हे सांगितले आहे. ते म्हणाले, ‘‘मी ९१ वर्षांचा आहे. आणि या वयात आपल्याला कोणतेही प्रयोग करायचे नाहीत. नितीशकुमार यांनी पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना माझे मन वळवण्यासाठी पाठवले. पण, मी त्यांना सांगितले, की तुम्हाला पुढे जायचे असेल, तर तुम्ही इतर पक्षांशी संपर्क साधू शकता.’’

Bihar CM Nitish Kumar India Alliance HD Deve Gowda
Ajit Pawar : अजितदादांना आपण चुकलोय हे समजलंय, त्यामुळंच ते नाराज आहेत; काय म्हणाले ठाकरे गटाचे आमदार?

पूर्वी धजदमध्ये असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर हल्लाबोल करताना देवेगौडा यांनी म्हटले की, काँग्रेसचे सिद्धरामय्या... ज्यांना मी राजकारणात आणले... तेच धजदमध्ये आले तर मी पक्षातून बाहेर पडेन. आपल्याला आता यावर अधिक चर्चा करायची नाही. मी पुरेसा अनुभव घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.