बिहारमधील सारण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या प्रियकराने दोन वर्षांपासून नातेसंबंधात असूनही लग्नास नकार दिल्याने त्याच्यावर हल्लाकरत प्रायव्हेट पार्ट कापले. या हल्यानंतर पीडित व्यक्तीला पाटणा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकऱणी आता तरुणीवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.
या सर्व प्रकरणाची माहिती सारण पोलिसांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. सारण पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, " एक जुलै रोजी मरहौरा पोलीस ठाण्यांतर्गत प्रेमप्रकरणातून एका मुलीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापून जखमी केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये मरहौरा पोलीस ठाण्याने कारवाई केली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी बेडप्रकाश उर्फ विकास सिंग, याला उपचारासाठी सदर हॉस्पिटल, छप्रा येथे पाठवण्यात आले आहे."
दरम्यान या हल्लेखोर तरुणीला चौकशीसाठी मरहौरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा चौकशीत तरुणीने सांगितले की, दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आज दोघेही छपरा येथील न्यायालयात लग्न करणार होते, मात्र पीडित तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने असा प्रकार केला.
याप्रकरणी मऱ्हाळरा पोलीस ठाण्यात मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. जखमी मुलाला सदर हॉस्पिटल, छपरा येथून पुढील उपचारांसाठी पाटणा येथील सृष्टी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या जखमी मुलावर पाटणा येथील सृष्टी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.