Bihar Election : लालूंच्या मतपेढीवर प्रशांत किशोर यांचा डोळा;बिहारमधील विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू

राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणारे प्रशांत किशोर हे आता राजकारणात उतरणार आहे. त्यांचा भावी पक्ष बिहारमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.
Bihar Election
Bihar Electionsakal
Updated on

उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा : राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणारे प्रशांत किशोर हे आता राजकारणात उतरणार आहे. त्यांचा भावी पक्ष बिहारमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. यासाठी विविध समाज आणि जाती-जमातींना जोडण्याच्या प्रयत्नात त्यांचा पहिला सामाना राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याशी होणार आहे. या पक्षाशी जोडला गेलेला जो समाज आहे, त्याचे समर्थन प्रशांत किशोर यांना मिळवायचे आहे.

राज्यात २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मुस्लिम आणि दलित उमेदवार उभे केले जातील, असे प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज अभियान’ या संघटनेकडून सांगण्यात येत आहे. आकडेवारीचा विचार करता या दोन्ही समूहांचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ‘मंडल-कमंडळ’ राजकारणाच्या काळात लालू प्रसाद यांच्याशी मुस्लिम आणि दलित समाज जोडला गेला. तीन दशकांनंतर या दोन्ही समूहांचा एक हिस्सा वेगळा होऊन मुख्यमंत्री नितीशकुमार, जीतनराम मांझी आणि भाजपशी जोडला गेला. तरीही मुस्लिम समुदायातील मोठा वर्गाला आजही लालू प्रसाद यादव यांच्या ‘आरजेडी’बद्दल ममत्व वाटते.

लालू प्रसाद यांची ताकद कमी करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ‘‘प्रशांत किशोर हे भाजपचे चेले असून या पक्षासाठीच ते काम करतात, ’’ अशी टीका ‘आरजेडी’चे प्रवक्ते शक्तिसिंह यादव यांनी केली आहे. ‘आरजेडी’च्या नावाने खोटे निवेदन प्रसिद्ध करून आमचे लोक त्यांच्याबरोबर आहेत, असा दावा प्रशांत किशोर करीत आहेत. भाजपसाठी मतांची बेगमी करण्यासाठी ‘आरजेडी’शी जोडलेला समाज तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही यादव यांनी केला. पण असे होणे अवघड असल्याची टीपणीही त्यांनी केली.

‘जेडीयू’चे नेते गप्प

प्रशांत किशोर त्यांच्या भाषणातून लालू प्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्यावर कठोर टीका करतात. ‘जनसुराज अभियान’शी घनिष्ठ संबंध असलेले ओमप्रकाश म्हणाले, की प्रशांत किशोर हवेत नाही तर पुराव्यानिशी बोलतात. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडतो. याचवेळी प्रशांत किशोर हे भाजपची ‘बी टीम’ असल्याचा दावा करणारे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते गप्प आहेत. कारण राज्यात ‘जेडीयू’ आणि भाजपची युती आहे. ‘‘भाजपच्या पैशांवर प्रशांत किशोर स्वतःचा राजकीय आधार शोधत आहेत, असा आरोप लालू प्रसाद यांच्याशी युती असताना ‘जेडीयू’चे अध्यक्ष ललनसिंह करीत असत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.