Nitish Kumar:'नितीश कुमार यांच्या जेवणात विष मिसळलं जातय', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानाने खळबळ

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी दावा केला की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विषप्रयोगाचा कट रचला जात आहे.
Nitish Kumar:'नितीश कुमार यांच्या जेवणात विष मिसळलं जातय', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानाने खळबळ
Updated on

Bihar CM Nitish Kumar:‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विष मिसळलेले अन्न खायला दिले जात आहे,’’ असा सनसनाटी दावा माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे(एचएएम- हम) अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी शुक्रवारी केला. मुख्यमंत्र्यांची खुर्ची लवकर अन्य कोणाला मिळावी, यासाठी हा कट रचला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मांझी यांनी आज विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

‘‘कोणाला तरी लवकरात लवकर मुख्‍यमंत्रिपदावर बसविण्यासाठी नितीशकुमार यांच्याविरोधात कट रचून त्यांना खाण्यातून विष दिले जात आहे. त्यामुळेच नितीशकुमार यांनी आधी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आणि नंतर माझाही अपमान केला’’ असे मांझी म्हणाले.

दिवाळीनंतर मी राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे. असेही त्यांनी सांगितले. बिहार सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मांझी म्हणाले, ‘‘नितीशकुमार यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. तसेच त्यांना असा कोणता पदार्थ खायला दिला जात आहे, ज्यामुळे ते आजारी पडत आहे, याचाही तपास करायला हवा. गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांवरून त्यांचे आरोग्य चांगले नसल्याचे दिसते. (Latest Marathi News)

Nitish Kumar:'नितीश कुमार यांच्या जेवणात विष मिसळलं जातय', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानाने खळबळ
Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी-दरी पुलावर भीषण अपघात; कंटेनरची ४ ते ५ वाहनांना धडक, दोघे ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.