हुंडा न मिळाल्यानं मुलानं लग्नाला दिला नकार; मुलीनं घेतला गळफास

Marriage
Marriageesakal
Updated on
Summary

मुलानं लग्नाला नकार दिल्याची माहिती विनिताला समजली आणि तिनं..

बिहारमधील (Bihar) नवादात एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. हुंड्याच्या रकमेची व्यवस्था करूनही मुलीचे वडील मुलाच्या घरी पोहोचू न शकल्यानं मुलीनं मृत्यूचा मार्ग पत्करलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केलाय.

हे प्रकरण नवादा येथील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दरियापूर गावातील रहिवासी असलेल्या माधवेंद्र चौधरी (Madhavendra Chaudhary) यांनी 6 महिन्यांपूर्वी पटना जिल्ह्यातील दरवे गावात मुलगी विनिता कुमारी हिच्याशी लग्न (Marriage) ठरवलं होतं. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत हुंड्याची रक्कम मुलांपर्यंत पोहोचवायची होती. पैशाची व्यवस्था होऊ न शकल्यानं मुलीच्या वडिलांनी मुलाला बोलावून हुंड्याच्या रकमेबाबत बोलायचं आहे, असं सांगितलं. परंतु, त्यानंतर मुलानं 2 वर्ष लग्नास नकार दिला.

Marriage
समीर वानखेडेंच्या हॉटेल-बारला दिलेला परवाना रद्द

मुलानं लग्नाला नकार दिल्याची माहिती विनिताला समजली आणि तिनं या त्रासाला कंटाळून ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. घटनेनंतर अकबरपूर पोलीस स्टेशन (Akbarpur Police Station) घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीची आई मिंता देवी यांनी सांगितलं की, विनिताला मुलाचा नकार सहन होत नव्हता, त्यामुळंच तिनं हे कृत्य केलंय. विनिता घरात एकटी असताना गळफास लावून घेतलाय, असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.