बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूत सामूहिक बलात्कार

Tamil Nadu Crime News
Tamil Nadu Crime Newsesakal
Updated on
Summary

पीडित तरुणी घटनेच्या दिवशी तिच्या मित्रासोबत चित्रपट पाहून घरी परतत होती.

पाटणा : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) बिहारच्या डॉक्टर मुलीसोबत एक भयानक घटना घडलीय. वेल्लोर येथील रुग्णालयात काम करणाऱ्या बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलीय. ही घटना उघडकीस आल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलंय.

महिला डॉक्टरसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं डॉक्टरांसह सर्वसामान्य जनता हादरलीय. ही घृणास्पद घटना ऑटोचालकानं त्याच्या इतर साथीदारांसह स्मशानभूमीजवळ घडवून आणल्याचं सांगण्यात येतंय. पीडितेनं या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना (Police) दिली. त्यानंतर तातडीनं कारवाई करत सामूहिक बलात्काराच्या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, वेल्लोरमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असं म्हंटलंय.

Tamil Nadu Crime News
Police : पोलिस उपनिरीक्षकानं 'खाकी'ला फासला काळीमा

पोलिसांच्या वृत्तानुसार, बिहारमधील रहिवासी पीडित तरुणी घटनेच्या दिवशी तिच्या मित्रासोबत चित्रपट पाहून घरी परतत होती. मध्यरात्री चित्रपट संपल्यानंतर दोघंही थिएटरसमोर ऑटोची वाट पाहत उभे होते. तेवढ्यात एक ऑटोचालक आला. त्या ऑटोमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त 4 जण आधीच बसले होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिनं ऑटो चालकाला हॉस्पिटलच्या दिशेनं चालवायला सांगितलं होतं. मात्र, काही अंतर गेल्यावर ऑटोचालकानं रस्ता बदलला आणि ऑटोचा वेगही खूप वाढला होता. महिला डॉक्टरनं ऑटो चालकाला मार्ग बदलण्याबाबत विचारले असता, त्यानं सांगितलं.. रात्री रस्ता बंद असतो, त्यामुळं मी दुसऱ्या मार्गानं जात आहे, असं तो म्हणाला. पीडित महिला डॉक्टरनं सांगितलं की, ड्रायव्हरनं वाटेत एका स्मशानभूमीजवळ निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली. त्यानंतर चार मुलं आणि ऑटोचालकानं माझा विनयभंग सुरू केला. मी विरोध केला असता, त्या सर्वांनी मला आणि माझ्या मित्राला बेदम मारहाण केल्याचंही तिनं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.