बिहारमध्ये नवीन राजकीय वाद, तेजप्रताप यादव दाजींना घेऊन पोहचले मंत्रिमंडळ बैठकीत

शैलेश कोणत्याही अधिकृत पदाशिवाय अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला
bihar
biharesakal
Updated on

बिहार मधील सत्तांतरानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मंत्रीमंडळ विस्तार केल्या नंतर कार्तिक शर्मा अपहरण प्रकरण समोर असतानाच,तेजप्रताप यादव आणि त्यांच्या मोठी मेहुणी मिसा भारती यांचे पती शैलेश यादव हे दोघे एकत्र बैठकीला आले होते. नंतर ते अधिकाऱ्यांच्या शेजारी बसले आणि टेबल वरील कागदपत्र चाळायला लागले.

दरम्यान तेज प्रताप यादव यांनी गुरुवारी प्रदूषण नियंत्रण विभागाची बैठक आयोजित केली होती.राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांचे पती शैलेश कुमारही यात दिसले. नवे पर्यावरण मंत्री तेज प्रताप हे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत असताना त्यांच्या शेजारी शैलेश यादव बसले होते. शैलेश कोणत्याही अधिकृत पदाशिवाय अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला होता.

मंत्री तेज प्रताप यादव यांचे ट्विट

या वर भाजपने जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळात स्थान नसलेल्या व्यक्तींना बैठकीला बसण्याची परवानगी कोणी दिली अस म्हणत नितीश कुमार यांना प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे बैठकीतील फोटो मंत्री तेज प्रताप यादव यांनी स्वतःहा ट्विट केला आहे.

नंतर त्याचे ट्विटर स्क्रोल करताना ते ट्विट सापडले नाही. वाद वाढल्यानंतर त्यांनी ते हटवले. मात्र त्याचा स्क्रीन शॉट घेऊन भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता आरजेडीची संपूर्ण ब्रिगेड लालूंच्या मदतीला आली आहे.

तेज प्रताप यादव चांगले मंत्री होवू शकतात

बिहार भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी नितीश सरकार वर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले मंत्री तेज प्रताप यादव यांना कोणी हलक्यात घेऊ नका आमचे मित्र शैलेशजी पण त्यांच्यासोबत बसले आहेत. शैलेशजी हे आरजेडीच्या सर्व मंत्र्यांपेक्षा नक्कीच जास्त हुशार - जाणकार - प्रतिभावान आहेत असा माझा अंदाज आहे. शैलेश भाईंचा आशीर्वाद राहिला तर तेज प्रताप हे उत्तम मंत्री ठरतील.

तेज प्रताप यादव समर्थनार्थ

आता आरजेडी नेते स्पष्टीकरण देत आहेत. प्रवक्ते शशी यादव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शैलेश यादव काही कामानिमित्त तेज प्रताप यांना भेटण्यासाठी गेले होते. मिटिंग चालू होती, त्यामुळे तिथेच बसून थांबायला सांगितले. मंत्र्यांच्या दालनात जाणे हा गुन्हा नाही. शैलेश कुमार यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला सूचना किंवा आदेश दिलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.