Crime: दुकानदाराकडून कुऱ्हाडीनं वार, तरुणीचं कापलं नाक, धक्कादायक कारण समोर, काय घडलं?

Bihar News: केवळ 15 रुपयांचे कर्ज एका मुलीला महागात पडले. अवघ्या 15 रुपयांसाठी दुकानदाराने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मुलीचे नाक कापून तालिबानी शिक्षा दिली.
Shopkeeper cut off woman nose
Shopkeeper cut off woman noseESakal
Updated on

बिहारमधील अररिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील तिरसकुंड पंचायतीच्या समौल हाटमध्ये शुक्रवारी एका दुकानदाराने शेजारी राहणाऱ्या महिलेचे नाक कापले. केवळ १५ रुपयांचे कर्ज फेडले नाही म्हणून आरोपीने हा गुन्हा केला. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी दुकानदार आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव बुलबुल खातून (२५ वर्षे) रा. तिरसकुंड समौल आहे. तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.