Political News : RJD च्या नव्या अध्यक्षाची लवकरच घोषणा!

जोपर्यंत कोणता निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष लालूच असतील : तेज प्रताप यादव
Tejashwi Yadav-Tej Pratap Yadav
Tejashwi Yadav-Tej Pratap Yadavesakal
Updated on
Summary

जोपर्यंत कोणता निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष तेच असतील : आमदार तेज प्रताप यादव

राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 10 फेब्रुवारीला होत आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या दिवशी पक्षाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांच्याकडं पक्षाची धुरा सोपवू शकतात, असंही बोललं जातंय. या बैठकीत लालू तेजस्वी यांना अध्यक्ष म्हणून घोषित करू शकतात.

Tejashwi Yadav-Tej Pratap Yadav
शिवसेना पुरस्कृत उमेदवारानं गळ्यात बुटांचा हार घालून सुरु केला 'प्रचार'

बैठकीत पक्षाची कमान तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडं सोपवण्यामागं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. चारा घोटाळ्याच्या (Fodder Scam Verdict) सर्वात मोठ्या खटल्याचा निकाल 15 फेब्रुवारीला रांची सीबीआय कोर्ट (Ranchi CBI Court) सुनावणार असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी जामिनावर असलेल्या लालूंना पुन्हा तुरुंगात जावं लागण्याची भीती आहे. या घडामोडीपूर्वी लालूंना पक्षाची कमान तेजस्वी यांच्याकडं सोपवायचीय.

Tejashwi Yadav-Tej Pratap Yadav
रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत पंतप्रधानांच्या भेटीला

लालूच पक्षाचे अध्यक्ष राहतील - तेज प्रताप

या अटकळांमध्ये तेजस्वी यांचा मोठा भाऊ आणि आरजेडी आमदार तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचं वक्तव्यही समोर आलंय. लालू यादव यांना संघटना नीट चालवण्याची सवय असून ते पक्षाचे अध्यक्षही असल्याचं तेज प्रताप यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत कोणता निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष तेच असतील, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. गेल्या वर्षभरापासून तेज प्रताप यांनी आरजेडीमध्ये सक्रियता वाढवलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.