ग्लासभर पाणी पिल्यामुळे दिव्यांगाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील एका गावात हा किळसवाना प्रकार घडला आहे. न विचाराता एक ग्लास पाणी पिल्यामुळे समाजकंटकांनी दिव्यांगाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दिव्यांगाला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला. बेगूसराय पोलिसांनी शनिवारी याची माहिती दिली. पोलिस आधिकाऱ्यानं सांगितलं की, बेगूसराय जिल्ह्यातील चौहारी स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बादेपुरा गावाता 50 वर्षीय छोटे लाल सहानी या दिवांगाला मारहाण झाली. पटना मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (पीएमसीएच) उपचार सुरु असताना मृत्यू जाला.
ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. गावाजवळील तलावात मासे पकडण्यासाठी दिव्यांग छोटे लाल साहनी गेला होता. घराकडे परत येताना त्याला तहान लागली होती. त्यामुळे एका ठिकाणी असलेल्या भांड्यातून एक ग्लास पाणी पिला. हे पाणी दिनेश साहनी याचं होतं. छोटे लाल पाणी पित होता तेव्हा दिनेश साहनी आणि मुलगा दीपक साहनी यांनी पाहिलं. या गोष्टीवर छोटे लाल याला लाथाबुक्क्या आणि काठीनं बेदम मारहाण केली. छोटे लाल याला अन्य गावकऱ्यांची मदतीनं घरी नेहलं. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असं पोलिस आधिकाऱ्यानं सांगितलं.
चौहारी स्टेशन पोलिस स्टेशनचे प्रमुख राघवेंद्र कुमार म्हणाले की, "छोटे लाल साहनी याचं पार्थिव गावात पोहचल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्यावर अंत्यंस्कार केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी दिनेश साहनी याला अटक केली आहे. अन्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.