पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मोठा राजकीय भूकंप करणार असल्याचं दिसून येतंय. नितीश यांनी जेडीयूला सोडून भाजपसोबत जाण्याची पूर्ण तयारी केल्याच्या बातम्या चार दिवसांपासून येत आहेत. या सत्तासंघर्षामध्ये शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे.
महाराष्ट्राचे नेते आणि सध्या भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे पाटण्यात पोहोचले आहेत. विनोद तावडेंनी अनेक राज्यांमध्ये भाजपला यश मिळवून दिलेलं आहे. त्यांच्याकडे बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ते दोन दिवसांसाठी पाटण्यात येणार असल्याचं शुक्रवारी स्पष्ट झालं होतं.
तावडे काही वेळापूर्वी पाटण्यात दाखल झालेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. फक्त एका वाक्यात विषय संपवला. बिहारमधल्या सध्याच्या घडामोडीवर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, आज आम्ही राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार आहोत. असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला.
यादरम्यान नितीश कुमार शनिवारी बक्सरच्या ब्रम्हपूर मंदिरात गेले होते. तेथे त्यांनी पूजा केली. सोबतच मंदिराच्या पुनरुज्जीवनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनांची पायाभरणी देखील केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अश्विनी कुमार चौबेही होते.
बक्सर येथूल पटण्याला परतल्यानंतर नितीश कुमार त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि त्यानंतर ते भाजपचं समर्थन घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात, असं सांगितलं जात आहे. शनिवारी रात्री बिहारमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.