Bihar Politics : बहुमत चाचणीपूर्वी ट्विस्ट; सभापतींचा राजीनामा देणार नकार

उपसभापती महेश्वर हजारी यांनी विजय कुमार सिन्हा यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला
Vijay Kumar Sinha Latest news
Vijay Kumar Sinha Latest newsVijay Kumar Sinha Latest news
Updated on

Vijay Kumar Sinha Latest news पाटणा : बिहारमधील (Bihar) नितीश-तेजस्वी यांच्या नव्या सरकारला बुधवारी (ता. २४) विधानसभेत बहुमत सिद्ध (Majority Test) करायचे आहे. मात्र, त्याआधीच राजकीय नाट्य सुरू झाले आहे. भाजप नेते विजय कुमार सिन्हा यांनी बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. विजय कुमार सिन्हा यांच्याविरोधात नव्या सरकारच्या आमदारांनी अविश्वास ठराव आणला होता.

अविश्वास प्रस्ताव असतानाही विजय कुमार सिन्हा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी नितीश-तेजस्वी सरकारच्या आमदारांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. नियम न पाळता आणण्यात आल्याचे सांगितले आहे. अविश्वास प्रस्तावात संसदीय नियमांची काळजी घेण्यात आली नसल्याचे विजय कुमार सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले.

Vijay Kumar Sinha Latest news
Video Viral : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलने मारहाण; महिलेवर कारवाईची मागणी

माझ्यावर पक्षपात आणि हुकूमशाहीचा आरोप आहे. दोन्ही आरोप खोटे आहेत. या परिस्थितीत राजीनामा दिल्यास माझा स्वाभिमान दुखावला जाईल, असे विजय कुमार सिन्हा म्हणाले. बिहारमध्ये भाजप-जेडीयू सरकार असताना विजय कुमार सिन्हा यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र, आता नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्या पक्ष आरजेडीसोबत सरकार स्थापन केले आहे. यामुळे भाजप (BJP) सत्तेतून बाहेर पडला आहे.

बिहार (Bihar) विधानसभेचे उपसभापती महेश्वर हजारी यांनी विजय कुमार सिन्हा यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पदावर राहण्याची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणी नैतिकतेची पर्वा करीत नसेल तर त्याला काय म्हणता येईल, असे महेश्वर हजारी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.