नितीशकुमार सरकारचा मंत्रिमंडळ वाटपाचा निर्णय, राजदला मिळू शकतात 'ही' महत्त्वाची खाती

नितीश कुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal
Updated on
Summary

नितीश कुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Bihar Politics : नितीश कुमार (Nitish Kumar) आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत तेजस्वी यादवही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, महाआघाडी सरकारच्या नव्या स्वरूपाची जोरात चर्चा सुरूय. नव्या सरकारमध्ये विभागांची ब्लू प्रिंट काय असेल, हा प्रश्न आहे.

भाजपच्या कोट्यातील संपूर्ण खाती राजद (RJD) आणि काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जेडीयूकडं (JDU) पूर्वीप्रमाणंच डझनभर खात्यांची जबाबदारी असू शकते. यामध्ये जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्या एका मंत्र्याचाही समावेश असेल.

Nitish Kumar
जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक सुरू, पोलिसांनी लष्कर-ए-तौयबाच्या दहशतवाद्याला घेरलं

विधानसभा अध्यक्षपद पुन्हा जेडीयूच्या खात्यात जाईल, असं मानलं जात आहे. सध्या विधानसभेचं उपसभापतीपद जेडीयूच्या महेश्वर हजारी यांच्याकडं आहे, त्यामुळं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर काही दिवसांनी विधानसभेचं उपसभापती पद त्यांच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे. राजद आणि काँग्रेसच्या (Congress) आमदारांची संख्या एकत्र केली, तर राजदला 17 मंत्रीपदं मिळू शकतात, तर काँग्रेसला तीन पदांवर समाधान मानावं लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Nitish Kumar
Bihar Politics : नितीशकुमारांचं सरकार अचानक कोसळलं नाही, तर 'ही' आहेत 4 कारण

याआधीही बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार असताना जवळपास त्याच सूत्रानुसार मंत्रिमंडळाची स्थापना झाली होती. मंगळवारी सर्वाधिक चर्चा सामान्य प्रशासन आणि पोलिस खात्याची झाली. आरजेडी गृहखातं मागत आहे, तर गृहखातं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडं असल्याचं दिवसभरात समोर आलं. अशा स्थितीत यावर अंतिम करार कसा झाला याचा खुलासा झालेला नाहीय. दरम्यान, राजदला मोठमोठी कामाची खाती मिळू शकतात, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.