नवी दिल्ली- जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महागठबंधन सोडण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे. आम्ही सगळे एकत्र आलो. महागठबंधन केलं, इंडिया आघाडीची स्थापन केली. पण, काहीही व्यवस्थित काम होत नव्हतं. काही लोकांचे मतं मी विचारात घेतली. त्यामुळे मी त्या लोकांचं ऐकलं आहे, असं नितीश कुमार म्हणाले.
सरकार बरखास्त करण्याची विनंती मी राज्यपालांकडे केली आहे. दीड वर्षांपासून गठबंधन बनवलं होतं. पण, परिस्थिती काही चांगली नव्हती. आम्ही चांगलं काम करत होतो. पण, लोक आमच्यावर नाराज होते. त्यामुळे आम्ही लोकांचं ऐकलं आहे, असं ते म्हणाले. संधासाधू असल्याच्या टीकेवरही नितीश कुमारांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही काम करत असतो. महागठबंधनमध्ये कोणीच काम करत नव्हतं. त्यामुळे देशात आणि राज्यात लोकांना अडचण होत होती, असं ते म्हणाले.
नितीश कुमार हे भाजपसोबत पुन्हा घरोबा करतील याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. नितीश कुमार यांची जेडीयू ही इंडिया आघाडीचा एक भाग होती. भाजपचा पराभव करण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता नितीश कुमार यांनी पुन्हा कोलांटउडी मारली आहे आणि आता ते पुन्हा भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे त्यांची संधीसाधू अशी प्रतिमा पक्की होत आहे.
नितीश कुमार आज नवव्यांदा एनडीएकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये आतापर्यंत पाचवेळा कोलांटउड्या मारल्या आहेत. २०१७ मध्ये त्यांनी जेडीयूची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अठरा महिन्यांनी त्यांनी भाजपला हात दाखवत पुन्हा काँग्रेस-आरजेडीसोबत महागठबंधन केलं होतं. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत जात आहेत. (Latest Marathi News)
माहितीनुसार, नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कायम असेल. तर भाजपकडून दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार आहे. त्यामुळे भाजपने इतर राज्यांमध्ये दोन उपमुख्यमंत्री देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारात शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे. सोहळ्याला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.