नितीशकुमारांनी 'ही' अट मान्य केल्यास, त्यांना पाठिंबा देणार; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

आता निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुन्हा नितीशसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झालीय.
Nitish Kumar Prashant Kishor
Nitish Kumar Prashant Kishoresakal
Updated on
Summary

आता निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुन्हा नितीशसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची (BJP) साथ सोडत ​​आरजेडीसोबत (RJD) सरकार स्थापन केलं. पण, राज्यातील राजकीय घडामोडी तिथंच थांबलेल्या नाहीत. आता निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) पुन्हा नितीशसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यांनी दोन दिवसांपूर्वी नितीशकुमार यांची भेट देखील घेतली आहे.

Nitish Kumar Prashant Kishor
गोव्यात राजकीय भूकंप होताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य; तवडकर म्हणाले, आता विरोधी पक्ष नेताच..

मात्र, या भेटीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी स्पष्टीकरणही दिलंय. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी नितीश कुमार यांची भेट घेतली आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ही बैठक केवळ सामाजिक, राजकीय आणि सौजन्यपूर्ण भेट होती. या दरम्यान आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, असं त्यांनी सांगितलं.

Nitish Kumar Prashant Kishor
Asad Rauf : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; माजी अंपायर असद रऊफ यांचं निधन

मी माझ्या अभियानातून मागं हटणार नाही. माझी जनसुराज्य यात्रा सुरूच राहणार असून मी राज्यातील सर्व लोकांना भेटून त्यांना बिहारच्या भविष्याबाबत समजावून सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका वर्षात 10 लाख बेरोजगार तरुणांना नोकऱ्या दिल्यास एका अटीवर नितीश कुमार यांच्यासोबत युती करणार असल्याचंही प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.