Bihar Reservation : OBC 18 टक्के, EBC 25 टक्के, SC 20 टक्के आरक्षण; बिहार सरकारने सादर केलं विधेयक

nitish kumar
nitish kumarsakal
Updated on

Bihar Reservation News : बिहारमधल्या नितीश कुमार सरकारने गुरुवारी विधानसभेमध्ये आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्ग, अतिमागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती; या प्रवर्गांना ६५ टक्के आरक्षण मिळण्याचं प्रावधान आहे.

सध्या या प्रवर्गांना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षण मिळत आहे. जातिगणनेचा अहवाल सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात ६५ टक्के आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यादृष्टीने सरकार पावलं उचलत आहे.

nitish kumar
Rajasthan Election: राजस्थानमध्ये भाजपचे OBC कार्ड; सत्तांतरासाठी मोठी खेळी

बिहारमध्ये सध्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. ईडब्ल्यूएसचं १० टक्के वेगळं आरक्षण आहे. जर नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाला तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मोडून ६५ टक्क्यांपर्यंत जाईल. याच्याशिवाय ईडब्ल्यूएसचं आरक्षण १० टक्के वेगळं असेल.

nitish kumar
Old Pension : सरकारच्या 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ; 30 नोव्हेंबरपर्यंत फायनल ऑर्डर

बिहारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी जातीवर आधारीत आरक्षण आता ५० टक्क्यांवरुन ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आतापर्यंत मागास-अतिमागास वर्गाला ३० टक्के आरक्षण मिळत होतं. परंतु नवीन मंजुरी मिळाल्यानंतर ४३ टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल. गुरुवारी सरकारने विधानसभेमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी प्रस्ताव मांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.