पाटना : बिहारमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकड्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबतची शंका खूप आधीपासूनच वर्तवली जात होती की, बिहारमध्ये कोरोनाचे खरे आकडे लपवले जात आहेत. मात्र, आता सरकारी रेकॉर्डमधील सावळ्या गोंधळाची ही बाब उघडकीस आली आहे. (Bihar Scandal in Corona statistics Health Department Revises COVID 19 Fatalities Confirms More Than 9000 Deaths)
बिहारमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना मृतांचा आकडा 5,458 वरुन वाढून थेट 9,429 वर पोहोचला आहे. म्हणजेच हे आकडे थेट 73 टक्क्यांनी वाढले आहेत. अशा परिस्थितीत हा सवाल विचारला जात आहे की, राज्य सरकारने हे कोरोना मृतांची आकडे कशासाठी लपवले होते? लोकांचं म्हणणं असं आहे की, जर हॉस्पिटल्स आणि स्मशानांधील आकड्यांचा अंदाज लावला गेला तर ही संख्या खूपच जास्त असल्याचं नक्कीच निष्पन्न होईल.
बिहार सरकार दर दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा जाहीर करत होती आणि हे आकडे जिल्ह्यांमधून पाठवल्या गेलेल्या रिपोर्टच्या आधारावर असायचे. मात्र, आता तपासणीत असं आढळून आलं आहे की, जिल्ह्यामधून मृतांची जी संख्या पाठवली जात होती त्यामध्ये मोठ्या संख्येने हेराफेरी केली गेली आहे.
हायकोर्टाने फटकारल्यानंतर 18 मे रोजी राज्य सरकारने कोरोनामुळे झालेल्या मृतांबाबतच्या तपासासाठी जिल्ह्यांमध्ये दोन प्रकारच्या टीम्स बनवल्या गेल्या होत्या. दोन्ही स्तरावरील तपासणीत आढळलंय की, मृतांचे आकडे लपवले गेले असून सरकारला देखील चुकीची माहिती पुढे पाठवली जात होती. आता तिथले नितीश सरकार चुकीचे आकडे पाठवणाऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा बोलत आहे.
गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्यापासूनच या संक्रमणाला बळी पडलेल्यांची संख्या वाढून 715179 झाली. यातील पाच लाखांहून अधिक लोक काही महिन्यांपूर्वीच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आरोग्य विभागाने कोरोना संक्रमणाच्या विळख्यातून सहिसलामत बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या मंगळवारी 701234 सांगितली होती. या आकड्याला बुधवारी पुन्हा दुरुस्त करुन 698397 केलं गेलं आहे.
बिहारमध्ये कोरोना रिकव्हरी रेट हा मंगळवारी 98.70 टक्के सांगितलं गेला होता. तो बुधवारी परत सुधारून 97.65 टक्के करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून या पद्धतीने हा सगळा सावळा गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला जात असताना विरोधी पक्षाला मात्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आयतं कोलित मिळाल्याचं चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.