Bihar Exam : शिक्षक भरती परीक्षा की कुंभमेळा? बिहारमधील बेरोजगारीचं भीषण वास्तव

bihar exam
bihar examesakal
Updated on

Bihar Teachers BPSC TRE Exam

पाटणा: बिहारमध्ये बीपीएससी शिक्षक भरती परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे. तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी लाखो विद्यार्थी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पोहोचू लागले आहेत. राज्यात तब्बल १.७० लाख पदांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षांसाठी आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला आहे.

विद्यार्थी रेल्वे स्टेशन, बस स्टेशन आणि रस्त्याच्या बाजूला जेथे मिळेत तिथे रात्री झोपल्याचं पाहायला मिळालं. पाटणा, भागलपूर, मुजफ्परपूर सह सर्व हॉटेल आणि धर्मशाला फूल झाले आहेत. परीक्षा दोन दिवस चालणार असल्याने विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करण्यात अडचण येत आहे. बिहारमधील लाखो बरोजगार तरुण रेल्वे, बस आणि मिळेल त्या वाहनाने परीक्षा केंद्र गाठत आहेत.

तब्बल १.७० लाख पदांसाठी भरती होणार असल्याने लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. गुरुवारपासून सलग तीन दिवस परीक्षा असणार आहे. राज्यातील ३८ जिल्ह्यातील ८५० परीक्षा केंद्र बनवण्यात आलेत. परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी आयोगाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. परीक्षा केंद्राच्या जवळपास कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

bihar exam
Sakal Podcast: चांद्रयान ३ यशस्वी ते बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत

गुरुवारी परीक्षा असल्याने बुधवारीच लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले होते. यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फूल झाल्याने खासगी वाहनांची मदत घेण्यात आली. पण, खासगी वाहन चालकांकडून मनमानी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांना अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात आले. हॉटेलमध्ये राहण्यासाठीही त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले. अनेक विद्यार्थी रस्त्याच्या बाजूला, रेल्वे स्टेशन, बस स्टेशनवरच झोपल्याचं पाहालया मिळालं.

bihar exam
Dream Girl 2: बिहार पोलिसांनी आयुष्मान खुरानाचे मानले आभार, हे आहे खास कारण

बिहारमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात भरती निघाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पण, परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा लोंढा पाहून बेरोजगारीचे वास्तव पुन्हा समोर आले. देशासह बिहारमध्ये बेरोजगारी गंभीर बनत असल्याचं यावरुन समोर येतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.