Bihar Train Derailed: बिहारमध्ये बुधवारी (दि.११ ऑक्टोबर) मोठी ट्रेन दुर्घटना घडली होती. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूरजवळ रात्री झालेल्या रेल्वे अपघाताबाबत प्राथमिक तपासात खुलासा झाला आहे. या प्राथमिक तपासणी अहवालात, दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरण्याचे संभाव्य कारण ट्रॅकमधील बिघाड असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक तपास अहवालाच्या हवाल्याने सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूरजवळ बुधवारी रात्री झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघाताच्या तपास अहवालावर अपघातग्रस्त ट्रेनच्या चालकासह सहा रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यात म्हटलय की, रेल्वेचे 23 डबे रुळांमधील बिघाडामुळे घसरल्याचं दिसतय.. या अपघातात लोको पायलट अंशत: जखमी झाला असून त्याच्या सहाय्यकाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात रेल्वेच ५२ कोटींच नुकसान झालं आहे.
विशेष म्हणजे या तपास अहवालात लोको पायलटच्या वक्तव्याचा समावेश करण्यात आला आहे. लोको पायलटनं सांगितलं की ट्रेन रघुनाथपूर स्टेशनवरून ताशी 128 किमी वेगाने गेली होती. मात्र, हा स्टेशन विभाग ओलांडल्यानंतर जोरदार धक्का बसला. जास्त कंपन आणि तीव्र धक्क्यामुळे ब्रेक पाईपचा दाब अचानक कमी झाला आणि रात्री 9.52 वाजता ट्रेन रुळावरून घसरली.(Latest Marathi News)
रघुनाथपूर स्थानकावरील गेटमन आणि पॉईंटमनच्या हवाल्याने प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की त्यांना ट्रेनच्या चाकांजवळून ठिणग्या येत असल्याचे दिसले. लोको पायलट आणि त्याच्या सहाय्यकाची श्वास विश्लेषक चाचणी अहवालात नकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारच मद्यपान केलेलं नव्हतं. (Latest Marathi News)
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
दरम्यान, पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंद्र कुमार यांनी सांगितले की, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची एक्स-ग्राशिया रक्कम दिली जाईल. गंभीर जखमींना 2.50 लाख रुपये आणि मध्यम जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचवेळी पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश म्हणाले की, ट्रॅक खुला करण्यास आमचे प्राधान्य आहे. प्रकाश यांच्या देखरेखीखाली ट्रॅक रिस्टोरेशनचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.