Narayana Murthy: नारायण मूर्ती स्वत:च शौचालय का साफ करतात? मुलाखतीत दिलं समर्पक उत्तर

Narayana Murthy Why Cleans His Toilets: इतके श्रीमंत आणि यशस्वी असलेले मूर्ती यांना स्वत: शौचालय साफ करण्याची गरज का पडली? असा प्रश्न त्यामुळे अनेकांना पडला होता.
Narayana Murthy Why Cleans His Toilets
Narayana Murthy Why Cleans His Toilets
Updated on

नवी दिल्ली- इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे स्वत: आपले शौचालय साफ करत असतात. इतके श्रीमंत आणि यशस्वी असलेले मूर्ती यांना स्वत: शौचालय साफ करण्याची गरज का पडली? असा प्रश्न त्यामुळे अनेकांना पडला होता. यावर नारायण मूर्ती यांनी भाष्य केलं आहे. एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मूर्ती म्हणाले की, माझ्या मुलांना मी सांगतो की इतरांबाबत आदर व्यक्त करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आपल्या समाजामध्ये जे लोक स्वच्छतेचे काम करतात त्यांच्याकडे खालच्या दर्जाचे म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे मी माझ्या मुलांना सांगत असतो की कोणीही आपल्यापेक्षा कमी नाही. (billionaire Narayana Murthy Was Asked Why He Cleans His Toilets)

Narayana Murthy Why Cleans His Toilets
Narayana Murthy: सुधा यांना कंपनीबाहेर ठेवणे ही माझी चूकच; नारायण मूर्ती यांची मुलाखतीदरम्यान कबुली

देवाने आपल्याला खूप चांगल्या स्थितीत ठेवलं आहे असं मी मुलांना सांगतो. भारतामध्ये स्वच्छता करणे कमीपणाचं समजलं जातं. खास करुन श्रीमंत कुटुंबांमध्ये हे दिसून येतं. आपण दुसऱ्यांना कमी लेखू नये. आपण फक्त चांगल्या स्थितीत जन्मलो आहोत. समाजातील इतर लोकांसोबत आपण न्यायपणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी मुलांना सांगत असतो, असं मूर्ती म्हणाले.

Narayana Murthy Why Cleans His Toilets
देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच देश आत्मनिर्भर करण्यासाठी लोकोपयोगी योजना - नारायण राणे

राजकारणात येणार का?

राजकारणात येण्याच्या शक्यतेबाबतही नारायण मूर्ती यांनी भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, राजकारणात येण्याचा त्यांचा कोणताही इरादा नाही. शिवाय ते आता ७८ वर्षांचे झाले आहे. त्यामुळे राजकारणासाठी ते खूप वयस्कर असल्याचं त्यांना वाटतं. आता मुलं आणि नातवांसोबत वेळ घालणार असल्याचं मूर्ती म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.