बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ ‘चेअर ऑफ एक्सलन्स’; लष्करप्रमुखांची घोषणा

Bipin Rawat
Bipin RawatSakal
Updated on

युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (USI) भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल दिवंगत बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या स्मरणार्थ ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. जनरल बिपिन रावत यांच्या ६५व्या जयंतीनिमित्त जनरल नरवणे (Army Chief Narwane) यांनी ही घोषणा केली. तसेच या संदर्भात लष्कराकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

युएसआयचे संचालक मेजर जनरल बीके शर्मा यांना पाच लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हा धनादेश मानद रक्कम म्हणून नियुक्त केलेल्या ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ला दिला जाईल. उल्लेखनीय आहे की यूएसआयचे संचालक मेजर जनरल बीके शर्मा निवृत्त झाले आहेत. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत हे एक असाधारण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भारतीय लष्करात अत्यंत महत्त्वाचे बदल केले, असेही निवेदनात म्हटले आहे.

Bipin Rawat
आता ‘डेल्टाक्रॉन’चा धोका; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

भारतीय (Indian Army) लष्कराचे २७ वे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेले ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ सशस्त्र दलांमध्ये एकता आणि अखंडता यावर लक्ष केंद्रित करेल आणि कार्य करेल. ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ हे जनरल रावत यांच्या कुशाग्र नेतृत्व आणि व्यवसायातील कौशल्याला आदरांजली आहे, असे लष्कराने निवेदनात म्हटले आहे.

मागच्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये जनरल रावत यांच्या पत्नीसह एकूण १४ जण हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले होते. या अपघातात सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.