Bird Flu Kerala: कोरोनानंतर बर्ड फ्लूचा कहर; 6000 हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू

जगावर बर्ड फ्लूचा धोका
Bird Flu
Bird Fluesakal
Updated on

Bird Flu: कोरोना महामारीशी झुंज देत असतानाच पुन्हा जगावर बर्ड फ्लूचा धोकाही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पंचायतींमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची समोर आलं आहे.

संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोंबडी आणि बदके मारण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत जिल्ह्यात 6,000 हून अधिक पक्षी मारले असून, त्यातमध्ये सर्वाधिक बदकांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "जिल्ह्यातील वेचूर, निनादूर आणि अर्पुकारा पंचायतीमध्ये शनिवारी 24 डिसेंबरला एकूण 6,017 पक्षी, सर्वाधीक बदकांचा मृत्यू झाला. वेचूरमध्ये सुमारे 133 बदके आणि 156 कोंबड्या, तर निनादूरमध्ये 2,753 बदके आणि अर्पुकारामध्ये 2,975 बदकांचा मृत्यू झाला आहे.

बर्ड फ्लू किंवा एव्हियन इन्फ्लूएंझा हा अत्यंत संसर्गजन्य अनुवांशिक रोग आढळून आला आहे. दुसरीकडे, केरळमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक लक्षात घेता लक्षद्वीपच्या प्रशासनाने चिकनच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Bird Flu
Sushma Andhare : माझ्यावर आरोप करणारे किर्तनकार हे मोहन भागवतांच्या संप्रदायचे; अंधारे कडाडल्या

मिळालेल्या माहिती नुसार मागील काही महिन्यांपूर्वी अलाप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद नगरपालिकेत अनेक पक्षी मरण पावल्यानंतर सरकारने कोंबडी आणि बदके मारण्याचे आदेश दिले होते. येथे सुमारे 20,471 पक्षी मारले गेले.

अलप्पुझा जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी बदक, कोंबड्या, पाळीव पक्ष्यांची अंडी आणि मांस खाण्यास आणि विक्रीवर बंदी घातली होती. त्याचबरोबर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून एक टीमही पाठवण्यात आली होती.

Bird Flu
Maharashtra Politics: विजय शिवतारे यांचा मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंच्या मनात...

हेही वाचा-Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएंझा असेही म्हणतात, जो एक विषाणूजन्य संसर्ग आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या मते, बर्ड फ्लू सामान्यतः पाळीव पक्ष्यांमध्ये जंगली पक्ष्यांमधून पसरतो.

हा विषाणू पक्ष्यांच्या आतड्यांवर किंवा श्वसनसंस्थेवर हल्ला करून त्यांना आजारी बनवतो. त्यामुळे अनेक वेळा पक्ष्यांचा मृत्यूही होतो.

माणसांनाही धोका असू शकतो का?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू हा एक इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो मानवांना तसेच प्राण्यांना संक्रमित करू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित पक्ष्याच्या थेट संपर्कात येते तेव्हा संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.