BIRSA MUNDA : स्वातंत्र्यासाठी लढणारा एक आदिवासी योद्धा ज्यांना देवाचा दर्जा देण्यात आला

1894 हे वर्ष बिरसा मुंडा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वर्षे ठरले....
BIRSA MUNDA
BIRSA MUNDAEsakal
Updated on

आदिवासी समाजातील लोक बिरसा मुंडा यांना भगवान बिरसा मुंडा हा दर्जा देतात. चला तर मग  आजच्या लेखात जाणून घेऊया कोण आहेत बिरसा मुंडा यांच्याबद्दल....बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील 'उलीहातू' या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते पहिलेच अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या प्रथा परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले.त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात गेले.त्यांचे वडील गुराखीचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी त्यांना शाळेत टाकण्याचा सल्ला त्यांच्या पालकांना दिला.

परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुलमध्ये घातला. परंतू पुढे तेथील धार्मीक सक्तीमुळे बिरसा मुंडा यांनी ती शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले. वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्या काळातच ब्रिटिश सरकारचे शोषण आणि दडपशाहीचे धोरण शिगेला पोहोचले होते. ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार, जहागीरदार, सावकार, सावकार इत्यादींनी आदिवासींचे प्रचंड शोषण करीत असत. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे प्रबोधन केले. 

BIRSA MUNDA
Winter Recipe: चवदार ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची?

1894 हे वर्ष बिरसा मुंडा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वर्षे ठरले....आदिवासींच्या जमिनी आणि हक्कांसाठी सरदार चळवळीत बिरसा मुंडा हे 1894 सामील झाले. यासोबतच त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे बिगुल वाजले. बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटीशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला.

BIRSA MUNDA
Winter Tips : हिवाळ्यात दुधात तुळशीचे पाने उकळून पिण्याचे काय आहे फायदे?

बिरसा मुंडा नवा धर्म कधी सुरू केला?बिरसा मुंडा यांनी 1895 मध्ये एक नवीन धर्म (Birsait) सुरू केला, ज्याला बिरसैत म्हणतात. एवढेच नाही तर या नवीन धर्माच्या प्रचारासाठी बिरसा मुंडा यांनी 12 शिष्यांची नियुक्तीही केली. आजही लोक बिरसैत धर्म मानतात पण त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहेपुढे बिरसा मुंडा हे अल्पावधीत लोकनेते झाले, त्यांना आदिवासी भाषेत ‘धरती आबा’ किंवा हिंदीत ‘भगवान’ म्हणू लागले. उपलब्ध कथेतील माहितीनुसार, बिरसैत धर्म स्वीकार करणे मोठे कठिन काम होते, कारण या धर्मात कोणीही मांस, दारू, खैनी, बिडीचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे.तसेच बाजारातुन विकत आणलेले खाद्यपदार्थ आणि दुसऱ्याच्या घरचे अन्न आणुन यावरही बंदी आहे.या धर्माच्या गुरुवारी झाडांची फुले, पाने तोडण्यास सक्त मनाई होती तसेच या दिवशी शेतीसाठी नांगरणीही करता येत नाही. बिरसैत धर्म मानणारे लोक फक्त निसर्गाची पूजा करतात.

BIRSA MUNDA
आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी

पुढे बिरसा मुंडा यांच्यावर इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. 9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.दरवर्षी 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.