Patiala birthday girl death news: घरात उत्सवाचे वातावरण होतं. 10 वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशी घरी सर्वांना आनंद झाला. वाढदिवसाचा केक कापला गेला आणि त्यानंतर सर्वांनी केक खाल्ला, फुगे फोडले आणि टाळ्या वाजल्या… पण दुसऱ्या दिवशी अचानक वाढदिवसाचा केक कापणाऱ्या मुलीची तब्येत बिघडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील पटियाला येथे ही धक्कादायक घटना घडली आहे, यामुळे कुंटूबाचा आंनद क्षणार्धात नाहीसा झाला.
पटियाला येथील मानवी नावाच्या 10 वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाला ऑनलाइन केक ऑर्डर करण्यात आला होता. केक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, आयपीसीच्या कलम 273 आणि 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या कुटुंबीयांनी वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. केक खाल्ल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यही आजारी पडले. मुलीच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.
बेकरी मालकावर ‘निष्काळजीपणाने मृत्यू आणि विषारी अन्न पुरवल्या’च्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 मार्च रोजी मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केकची ऑनलाइन ऑर्डर देण्यात आली होती. कुटुंबीयांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र 10 वर्षीय मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मानवी असे या 10 वर्षीय मुलीचे नाव आहे. मानवीच्या आजोबांनी सांगितले की, २४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता ऑनलाइन केक ऑर्डर केला होता. रात्री 11 च्या सुमारास संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ लागला. त्यावेळी घरात पाच जण होते. सर्वात लहान मुलीचा जीव वाचला कारण तिने केक खाल्यानंतर उलटी केली होती, मात्र, १० वर्षांच्या मानवीने आपला जीव गमावला.
त्याने सांगितले की, केकची ऑर्डर मुलीची आई काजलने केली होती. बिलावर पटियाला येथील नोंदणीकृत 'केक कान्हा'चा पत्ता दिला आहे, मात्र, त्याठिकाणी या नावाचे कोणतेही दुकान नाही.
याप्रकरणी बेकरी हे क्लाउड किचन असल्याचा संशय पोलिसांना आहे. याशिवाय, Zomato कडील आणखी एक पावती चालान दाखवते की बिलिंग अमृतसरमधून केले गेले आहे आणि पटियाला येथून नाही, यामुळे नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.