Foxconn iPhone Plant: विवाहीत महिलांना नोकऱ्या न देणाऱ्या कंपनीने दिलं स्पष्टीकरण? कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांची संख्याही केली उघड

Foxconn iPhone Plant: भारतातील आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉन पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या कंपनीवर प्लांटमध्ये विवाहित महिलांना नोकरी न दिल्याचा आरोप होता. आता फॉक्सकॉनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. कंपनीने सांगितले की त्यांच्या प्लांटमधील सुमारे 70 टक्के कर्मचारी महिला आहेत. या रिपोर्टमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Foxconn iPhone Plant
Foxconn iPhone PlantEsakal
Updated on

फॉक्सकॉन भारतात ॲपलचा आयफोन असेंबली प्लांट चालवते. आता ही कंपनी वादात सापडली आहे. कंपनीने विवाहित महिलांना नोकरी न दिल्याचा आरोप केला. या आरोपाबाबत कंपनीने स्पष्टीकरण सादर केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, फॉक्सकॉनने सरकारला कळवले आहे की, त्यांच्या नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के विवाहित महिला आहेत. कंपनीने त्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलची पूर्ण काळजी घेतली आहे. याशिवाय, कंपनीने सांगितले की ते लिंग किंवा धर्म भेदभाव करत नाही.

फॉक्सकॉनने स्पष्टीकरण दिले

एका हिंदी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉनने सरकारला सांगितले की, त्यांच्या नोकरीच्या धोरणात अशी कोणतीही अट नाही की विवाहित महिलांना कामावर घेतले जाणार नाही. ज्यांना कामावर घेतले नाही अशा लोकांनी हा दावा केला असावा असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने मीडिया रिपोर्ट्सचे खंडन केले आणि म्हटले की अशा बातम्या भारतीय उत्पादन क्षेत्राची बदनामी करतात.

Foxconn iPhone Plant
Labour Ministry On Foxconn iPhone Plant: विवाहित महिलांना iPhone निर्मिती कंपनीत नोकरी नाही? सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, मागवला अहवाल

फॉक्सकॉनने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या नवीनतम नियुक्त्यांपैकी 25 टक्के विवाहित महिला आहेत. याचा अर्थ कंपनीतील एकूण महिलांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला विवाहित आहेत. सध्या, फॉक्सकॉन कंपनीत अंदाजे 70 टक्के महिला आणि 30 टक्के पुरुष आहेत. देशातील महिलांना रोजगार देणारा हा सर्वात मोठा कारखाना आहे. या प्लांटमध्ये सुमारे 45,000 कामगार आहेत.

Foxconn iPhone Plant
Foxconn: 'विवाहित महिलांना iPhone निर्मिती कंपनीत नोकरी नाही? सरकारने उचलले मोठे पाऊल

सरकार अॅक्शन मोडमध्ये

फॉक्सकॉनवर आरोप झाल्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने बुधवारी तामिळनाडू कामगार विभागाकडून अहवाल मागवला आहे.

मंत्रालयाने सांगितले की, मीडिया रिपोर्ट्सनुसार फॉक्सकॉन इंडिया विवाहित महिलांना ॲपल आयफोन प्लांटमध्ये काम करण्याची परवानगी देत ​​नाही. या मुद्द्यावर तामिळनाडू कामगार विभागाला लवकरात लवकर अहवाल सादर करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.