भाजपचा 55-45 चा फॉर्म्युला, अमरिंदर यांच्या पक्षासोबत 'युती'

भाजपनं इथं अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल संयुक्त या पक्षांशी युती केली आहे.
J P Nadda_Capt Amrinder Singh
J P Nadda_Capt Amrinder Singh
Updated on

चंदीगड : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election) भाजपनं इतर दोन पक्षांशी युतीची घोषणा केली आहे. तसेच या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची प्रक्रियाही अंतिम झाली आहे. त्यानुसार भाजप (BJP), पंजाब लोक काँग्रेस (Punjab Lok Congress), शिरोमणी अकाली दल संयुक्त (Shiromani Akali Dal united) यांची निवडणूक पूर्व युतीवर शिक्कामोर्तब झालंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. (Punjab BJP 55 to 45 formula fixed alliance with Captan Amarinder Singh Punjab Lok Congress)

J P Nadda_Capt Amrinder Singh
शरद पवार कोरोना संक्रमित कळताच PM मोदींना काळजी; लगेच केला फोन!

नड्डा म्हणाले, "पंजाबमधील भाजपप्रणित युतीमध्ये भाजपला ६५, पंजाब लोक काँग्रेसला ३७ तर शिरोमणी अकाली दलाला १५ जागांचं वाटप करण्यात आलं आहे. पंजाबमध्ये आम्हाला विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. सुरक्षा हा एक खूपच छोटासा मुद्दा आहे पण ही निवडणूक पंजाबमध्ये स्थिरता आणि सुरक्षेसाठी असेल. पंजाबला रुळावर आणणं हा आमचा हेतू आहे. सन १९८४ च्या दंगलीच्या चौकशीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे, यातील आरोपी आता तुरुंगात आहेत. आम्ही पंजाबमधून 'माफिया राज' संपवणार आहोत"

J P Nadda_Capt Amrinder Singh
''ठाकरे सरकार आता प्रताप सरनाईक यांची आमदारकी रद्द करणार का?''

जास्तीत जास्त शीख उमेदवारांना संधी

पंजाबच्या निवडणुकीसाठी आमच्या त्रिसदस्यीय युतीनं शीख समुदयासाठी खास रणनीती बनवली आहे. निवडणूक मंथनानंतर आम्ही सर्व सहकारी पक्षांनी हे निश्चित केलंय की, विधानसभेतील एकूण ११७ जागांपैकी ७० जागांवर शीख उमेदवारांनी तिकीटं दिली जातील. एकट्या भाजपनं ३३ ते ३५ शीख उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर युतीतील इतर दोन पक्षांनीही आपले उमेदवार देण्याचं आवाहन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं केलं आहे, असंही नड्डा यावेळी म्हणाले.

तिन्ही राजकीय पक्षांसाठी निवडणूका महत्वाच्या

पुढील महिन्यात होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांची युती तुटल्यानंतर भाजपसह माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंह ढिंडसा यांच्या शिरोमणी अकाली दल संयुक्त या तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. भाजप इथं आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यासाठी इतर पक्षांना सोबत घेऊन त्यांच राजकारण सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()