Mallikarjun Kharge Video : प्रियंका गांधी अर्ज दाखल करताना खर्गे दाराबाहेर उभे? दलितांचा अपमान झाल्याचा भाजपचा आरोप

BJP Shares Mallikarjun Kharge Video : भाजपने व्हिडीओ क्लिप शेअर करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
Mallikarjun Kharge Video : प्रियंका गांधी अर्ज दाखल करताना खर्गे दाराबाहेर उभे? दलितांचा अपमान झाल्याचा भाजपचा आरोप
Updated on

भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा काँग्रेसचे दलित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आपमान केल्याचा आरोप केला आहे. भाजपने एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये खर्गे दरवाज्याच्या बाहेरून खोलीत पाहाताना दिसत आहेत.

भाजपने दावा केला आहे की, हा व्हिडीओ काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळचा आहे. तसचे भाजपचा आरोप आहे की आपल्या कुटुंबातील नसल्याने खर्गे यांना अशी वागणूक दिला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.