नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याच्या दावा भाजपचे नेते अमित मालवीय यांनी केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील हल्ल्याच्या संदर्भ देत त्यांनी ही टीका केली आहे. मालवीय यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्याची एक मुलाखतीतील काही भाग पोस्ट करण्यात आला आहे. ट्रंप यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणारे विरोधी पक्षाने राहुल गांधी यांच्यावरही मालवीय यांनी या निमित्ताने टीका केली आहे.
ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांच्या समर्थकांनी डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेत्यांना दोषी धरले आहे. ‘‘बायडेन आणि त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांनी ट्रंप यांची प्रतिमा हुकूमशहा आणि लोकशाहीविरोधी नेता अशी केली होती. ट्रंप यांच्यामुळे लोकशाही धोक्यात आहे असा अपप्रचार करण्यात आला आणि त्यामुळेच ट्रंप यांच्याविरोधात असंतोष निर्माण होऊन त्यांच्यावर हल्ला झाला,’’ असा आरोप ट्रंप समर्थकांकडून होत आहे.
हाच संदर्भ देत, मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्याकडून तिसऱ्यांदा पराभूत झालेल्या राहुल गांधी यांनी देखील काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वक्तव्ये केली होती. ज्यायोगे त्यांच्याविरोधात चिघळून रोष वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमध्ये गेले असता त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या होत्या, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उड्डाणपुलावर अडकून पडले होते.
ही घटना कोणी कशी विसरू शकेल.‘‘ज्याप्रमाणे अमेरिकेत वर्णद्वेषाचे निमित्त करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचप्रमाणे भारतात जातींमध्ये परस्परांबद्दल द्वेष निर्माण केला जात आहे. दोन्ही ठिकाणी समान पद्धतीने सुरू असलेला प्रचारा हा काही योगायोग नाही,’’ असा दावा भाजप कडून करण्यात आला. ‘‘भारतातील निवडणुकीमध्ये परकीय हस्तक्षेपाची मागणी करणारे राहुल गांधी यांना सलग तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पराभव पत्करावा,’’ असा टोलाही मालवीय यांची यावेळी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.