VIDEO: 'लाल डायरी'ला मुख्यमंत्री अशोक गेहलोत इतके का घाबरतात? अमित शाहांचा निशाणा

amit shah ashok gehlot
amit shah ashok gehlotesakal
Updated on

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी राजस्थानच्या गंगापूरमध्ये शेतकऱ्यांच्या संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आजकाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत लाल डायरीपासून घाबरले आहेत. ते का घाबरले आहेत? लाल डायरीमध्ये त्यांचे काळे कारनामे आहेत. लाल डायरीत कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा आहे, असं शहा म्हणाले. (bjp amit shah criticize Rajasthan cm ashik Gehlot and congress)

अमित शहा यांनी यावेळी अशोक गेहलोत यांना थेट आव्हान दिलं. ते म्हणाले की, 'हिंमत असेल तर गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला तयार रहावं. सर्व काही समोर येईल.' अमित शहा गंगापूर येथे पोहोचल्यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. यावरुनही शहा यांनी गेहलोत यांच्यावर टीका केली.

amit shah ashok gehlot
Amit Shah Pune Visit : अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

गेहलोत साहेबांनी काही माणसं पाठवली आहेत. त्यांच्या लोकांना घोषणाबाजी करु द्या. तेथे कोणी जाऊ नका. ते काहीवेळ आपल्या कार्यक्रम केल्यानंतर थकून जातील आणि घरी परततील, असं ते म्हणाले. शाह यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा त्यांनी पाढा वाचला.

amit shah ashok gehlot
अमित शहा यांच्यावरील ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

चांद्रयान-३ च्या यशाबाबत त्यांनी भाष्य केलं. यामुळे भारतीय अवकाश क्षेत्राला नवी गती आणि दिशा मिळाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. हा देशासाठी गौरवाचा विषय आहे. मी त्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना म्हणतो, त्यांनी चांद्रयानसाठी काही केलं असतं, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असं तो

amit shah ashok gehlot
BJP News : कर्नाटक पराभवातून धडा! मध्यप्रदेशसाठी स्वतः अमित शहा उतरणार मैदानात

केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप काम केलं आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मागील काँग्रेसच्या कार्यकाळात शेतीसाठी बजेट २२,००० कोटी रुपयांचे होते. मोदींच्या काळात हे वाढून १,२५,००० कोटी रुपये झाला आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या आहेत, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.