राजस्थानसाठी भाजपची 15 उमेदवारांची यादी जाहीर; वसुंधराराजे समर्थकांकडे दुर्लक्ष

Rajasthan Assembly Election 2023
Rajasthan Assembly Election 2023
Updated on

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 15 उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. ताज्या यादीत वसुंधरा राजे शिंदे यांच्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्स मतदारसंघात पक्षाने पत्रकार गोपाल शर्मा यांना तिकीट दिले असून त्यांची लढत राजस्थान सरकार मधील दिग्गज मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांच्याशी होणार आहे. माजी मंत्री अरुण चतुर्वेदी यांचे तिकीट याठिकाणी कापण्यात आले आहे. चतुर्वेदी हे वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

कोलायत मतदारसंघात भाजपने उमेदवार बदलला आहे. दिग्गज नेते देवीसिंह भाटी यांची सून पूनम कंवर यांना आधी तिकीट देण्यात आले होते, मात्र आता त्यांचे नाव वगळून अंशूमन सिंह भाटी यांना तिकीट देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

वसुंधराराजे यांचे अन्य निकटवर्तीय अशोक परनामी यांनादेखील तिकीट नाकारण्यात आले आहे. शाहपूर मतदारसंघात त्यांच्याऐवजी बेरोजगार युवक संघाचे अध्यक्ष उपेन यादव यांना संधी देण्यात आली आहे. कोटा उत्तर मतदारसंघात प्रल्हाद गुंजल यांना तिकीट देण्यात आले आहे.

Rajasthan Assembly Election 2023
Sudhir Mungantiwar : ''नशेच्या पदार्थांचे लायसन्स असलेल्या नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे''

पक्षाने ज्या अन्य नेत्यांना तिकीट दिले आहे, त्यात अमित चौधरी (हनुमानगड), राजकुमार रिणवा (सरदारशहर), चंद्रमोहन बटवाडा (किशनपोल), रवी नय्यर (आदर्श नगर), विजय बन्सल (भरतपूर), नीरजा शर्मा (राजखेरा), अभिषेक सिंह (मसूदा), बाबूसिंह राठोड (शेरगड), के. जी. पालिवाल (मावली), प्रेमचंद गोचर (पिपल्दा) आणि राधेश्याम बैरवा (बारा अटरु) यांचा समावेश आहे. भाजपने आतापर्यंत 200 पैकी 199 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले आहेत. 

Rajasthan Assembly Election 2023
Baba Vanga Predictions: "पुतिनची हत्या, कर्करोगावर उपचार, 2024 मध्ये येतील भयंकर संकटं"; बाबा वेंगाची 7 भाकितं 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.