Vinod Tawde : का कही! लोकसभेसाठी भाजपात महत्त्वपूर्ण बदल; तावडेंवर मोठी जबाबदरी

भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी विविध राज्यांच्या प्रभारींची घोषणा केली आहे.
vinod tawade
vinod tawadeSakal
Updated on

BJP Appoints Incharge For States : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी विविध राज्यांच्या प्रभारींची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ओम माथूर यांची छत्तीसगडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालची जबाबदारी मंगल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंगल पांडे बिहारमध्ये आरोग्य मंत्री आहेत. तर, प्रकाश जावडेकरांनी केरळचे प्रभारी बनवण्यात आले असून, लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

vinod tawade
राहुल गांधींच्या 41 हजारांच्या शर्टवरून वातवरण तापलं; भाजपनं करून दिली 1971 ची आठवण

आमदार विजय भाई रुपानी यांना पंजाबचे प्रभारी तर डॉ.नरेंद्रसिंग रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन यांची तेलंगणचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

vinod tawade
राहुल गांधींच्या 41 हजारांच्या शर्टवरून वातवरण तापलं; भाजपनं करून दिली 1971 ची आठवण

भाजपकडून नव्या नियुक्त्या

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रभारींच्या फेरबदलामध्ये आमदार विजय भाई रुपानी यांना पंजाबच्या प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ. नरेंद्रसिंग रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर, अरविंद मेनन यांची तेलंगणचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

vinod tawade
Queen Elizabeth : राजघराण्याचा सूर्य मावळतोय...राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

खासदार अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी बनवण्यात आले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सहप्रभारी असतील. खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर चंदीगडचे प्रभारीपदी विजय भाई रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईशान्य प्रदेशात संबित पात्रा यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ऋतुराज सिन्हा सह-संयोजक म्हणून काम पाहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.