काँग्रेस सावरकर-सुभाष बाबूंबद्दल भ्रम पसरवित आहे; भाजपचा आरोप

काँग्रेस पक्ष हा केवळ नेहरू-गांधी परिवाराची पार्टी आहे. या घराण्यांचे महात्म्य सर्वोपरी ठेवण्यासाठी देशातील महापुरुषांच्या विरोधात हा पक्ष भ्रम पसरवित आहे
veer savarkar subhash chandra bhose
veer savarkar subhash chandra bhosesakal media
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष हा केवळ नेहरू-गांधी परिवाराची पार्टी आहे. या घराण्यांचे महात्म्य सर्वोपरी ठेवण्यासाठी देशातील महापुरुषांच्या विरोधात हा पक्ष भ्रम पसरवित आहे, असा पलटवार भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.

veer savarkar subhash chandra bhose
रामायणावरील क्विझ जिंका आणि अयोध्येचा हवाई दौरा करा

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे नेते तारीक हमीद कारा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्याचा निषेध करीत पात्रा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. पक्षाच्या मुख्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. नेहरू गांधी परिवाराला सर्वोपरी ठेवण्यासाठी काँग्रेस वीर सावरकर, सुभाष बाबू यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते समाजात भ्रम पसरवित आहेत, असा आरोप त्यांनी केला.

संबित पात्रा म्हणाले, "काश्मीर हे नेहरूंनी भारतात आणले. सरदार पटेल आणि जिना यांनी संगनमत केले आणि काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवले, असे विधान कारा यांनी केले आहे. पण पटेल यांची अखंड भारत ठेवण्याची भूमिका सर्वश्रृत आहे. तरीही काँग्रेसकडून खोटे विधाने पेरून भ्रम पसरविला जात आहे. देशात या पक्षाचा जनाधार झपाट्याने घटला आहे. त्यामुळेच असा खोटा प्रचार त्यांना करावा लागत असल्याची टीका पात्रा यांनी केली.

veer savarkar subhash chandra bhose
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक; ठरणार निवडणुकांची रणनीती

राहुल, सोनिया यांच्या समोर कारा यांनी हे विधान केले आहे. पटेल यांचे योगदान या दोघांनाही माहीत होते. पण त्यांनी त्यावर काहीच आक्षेप घेतला नाही.आता तारीक कारा यांच्यावर काँग्रेस कोणती करणार? अशी विधाने करून चाटूगिरीची परिसीमा काँग्रेसमधे गाठली गेली आहे, अशी टीका पात्रा यांनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.