Shivraj Patil: मुस्लीम मतांसाठी किती...शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर भाजप संतापली

Bjp Atul Bhatkhalkar On Congress Ex Home Minister Shivraj Singh Statement
Bjp Atul Bhatkhalkar On Congress Ex Home Minister Shivraj Singh Statementesakal
Updated on

कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी केलं आहे. दरम्यान, भाजपने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लीम मतांसाठी किती शेण खाणार? अशा तीव्र शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (Bjp Atul Bhatkhalkar On Congress Ex Home Minister Shivraj Singh Statement )

शिवराज पाटील यांच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मुस्लीम मतांसाठी किती शेणार खाणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

तसेच “शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्या राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा उल्लेख केला, तुकडे-तुकडे गँगचं समर्थन केलं., त्या पक्षाच्या नेत्याकडून इतर काही अपेक्षा करु शकत नाही,” असं ते एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

यासोबतच, “गीता इतका महान ग्रंथ आहे की, १० हजार वर्षानंतरही त्याची मोहिनी आज सगळ्या जगावर आहे. जगातील सर्व तज्ज्ञ, विचारवंत गीतेने भारावले असताना शिवराज पाटील त्याची तुलना जिहादशी करत आहेत. गीता कर्माचा संदेश देते. पण शिवराज पाटील यांचं डोकं सडलेलं आहे. खरं तर काँग्रेसची अख्खी विचारसरणी ही सडकी आणि नास्तिक आहे याचं उदाहरण असल्याचेही भातखळकरांनी म्हटलं आहे.

शिवराज पाटील नेमकं काय म्हणाले?

जिहादचा विषय तेव्हा येतो जेव्हा मनात स्वच्छ विचार असून देखील त्यापध्दतीचे काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील कोणी ते समजून घेत नसेल तर म्हटले जाते की शक्तीचा उपयोग करावा लागला तर तो केला पाहिजे. हे फक्त कुराणमध्ये सांगितलेले नाहीये. तर ते महाभारतात जो गीतेचा भाग आहे त्यामध्ये श्रीकृष्ण देखील अर्जुनाला जिहाद बद्दलच सांगतात, असे शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()