मंगळुरु : पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर मोदी सरकारनं बंदी घातली तसेच संघटनेशी संबंधीत अनेकांवर छापेमारीही सुरु आहे. पण आता याच पीएफआयची राजकीय विंग असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाशी (SDPI) भाजपनं कर्नाटकातील पंचायत निवडणुकांमध्ये युती केल्याची चर्चा आहे.
तळापडी ग्राम पंचायतीत भाजपच्या पाठिंब्यानं एसडीपीआयचा सरपंच झाला आहे. पण भाजपनं हा दावा नाकारला आहे. (BJP backed members help SDPI member become gram panchayat president in Karnataka Talapady)
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, तळापडी ग्रामपंचायत निवडणुकीत एसडीपीआयच्या टी इस्माईल यांची सरपंचपदी निवड झाली तर भाजपच्या पुष्पावती शेट्टी यांची उपसरपंचपदी निवड करण्यात झाली. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झालेल्या एसडीपीआयच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिला आहे, गुरुवारी ही निवडणूक पार पडली.
ग्रामपंचायतमधील २४ सदस्यांपैकी १३ सदस्य हे भाजपच्या पाठिंब्यानं तर उर्वरित १० सदस्य हे एसडीपीआयच्या पाठिंब्यानं निवडून आले आहेत. तर केवळ एकच सदस्य काँग्रेसचा आहे. तसेच सुरुवातीला भाजपचा पाठिंबा असलेल्या सत्यराज आणि एसडीपीआयचा पाठिंबा असलेल्या टी इस्माईल या दोघांना सरपंचपदासाठी सारखीच मतं मिळाली. भाजपला याची खात्री होती की आपला उमेदवार सरपंचपदी निवडून येईल. पण यामध्ये दोन सदस्यांनी इस्माईल यांच्या समर्थनार्थ क्रॉस वोटिंग केल्यानं त्यांचा खेळ बिघडला.
तसेच काँग्रेसचं समर्थन असलेले सदस्य वैभव शेट्टी आणि एनडीपीआयचे समर्थक हबीबा हे निवडणुकीदरम्यान गैरहजर राहिले होते. यानंतर रिटनिंग ऑफिसर श्वेता यांनी लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत इस्माईल यांची सरपंचपदी निवड घोषित करण्यात आली.
दरम्यान, भाजपनं पीएफआयची राजकीय संघटना असलेल्या एसडीपीआयला पाठिंबा दिल्याचा दावा नाकारला आहे. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटलं की, "ग्रामपंचायतच्या निवडणुका या पक्षाच्या स्तरावर लढल्या जात नाहीत. भाजपनं एसडीपीआयला किंवा इतर कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.