गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघात सहा मे रोजी पंतप्रधान मोदी (PM Modi) जाहीरसभेला उपस्थित राहणार होते. ती आता रद्द करण्यात आली आहे.
बंगळूर : भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड (Manikant Rathore) यांच्यावर चोरीचा आरोप सिद्ध झाला असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्तापूर येथील प्रचारसभा (Karnataka Assembly Election) रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघात सहा मे रोजी पंतप्रधान मोदी (PM Modi) जाहीरसभेला उपस्थित राहणार होते. ती आता रद्द करण्यात आली आहे. चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील (Chittapur Assembly Constituency) भाजपचे उमेदवार (BJP Candidate) मणिकांत राठोड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
या निर्णयावरून विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. आता राठोड यांच्यावरील चोरीचा आरोप सिद्ध झाल्याने भाजपला खडबडून जाग आली आहे. चित्तापूरमध्ये राठोड यांचा मोदी प्रचार करणार होते. काळसंते येथील अंगणवाडीतील मुलांसाठी दूध पावडर विकल्याप्रकरणी मणिकांत राठोड यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
राठोड यांनी न्यायालयात अपील दाखल केल्याचं कळतं. या स्थितीत मणिकांत यांचा मोदींनी प्रचार केला तर भाजपला गोत्यात येऊ शकतो. 28 एप्रिल रोजी बोम्मई यांनी चित्तापूरमध्ये राठोड यांच्यासाठी रोड शो आयोजित केला होता. मुख्यमंत्र्यांनी अशा उमेदवारासाठी मतांची भीक मागणे, ही शोकांतिका असल्याचं काँग्रेसनं सांगितलं.
काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांवरही गुन्हे दाखल आहेत. काही नेते जामिनावर बाहेर आहेत. तुमचा शब्द पाळला आणि हाच नियम काँग्रेसच्या नेत्यांना लागू केला, तर तुम्हा सर्वांना राजकारणापासून दूर राहावे लागेल.
-बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.