Loksabha Election: आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल, काय घडलं नेमकं ?

Loksabha Election: काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.
bjp won surat loksabha
bjp won surat loksabha esakal
Updated on

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खाते उघडलं आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी आली आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित 8 उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली असून, त्यानंतर भाजपचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले आहे. मुकेश दलाल येथून भाजपचे उमेदवार आहेत.

bjp won surat loksabha
Mamata Banerjee : बंगालमध्ये 26/11 सारख्या हल्ल्याचा प्लॅन, अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेर रेकी करणारा संशयित अटकेत

सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी हे त्यांच्या तीनपैकी एकही प्रस्तावक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडू शकले नाहीत, त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर तीन प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केला होता.

bjp won surat loksabha
NCP Manifesto: यशवंतरावांना भारतरत्न, मराठी भाषा, परराष्ट्र धोरण... राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात अजित पवारांची कोणती आश्वासने?

त्याचवेळी उमेदवारी नाकारल्याचा ठपका काँग्रेसने सरकारवर ठेवला आहे. सरकारच्या धमकीपुढे सगळेच घाबरले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि अधिवक्ता बाबू मांगुकिया म्हणाले की, आमच्या तीन प्रस्तावकांचे अपहरण झाले आहे, निवडणूक अधिकाऱ्याने अपहरणाची चौकशी करावी आणि फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे की नाही तर स्वाक्षऱ्या न करता फॉर्म रद्द करणे चुकीचे आहे, प्रस्तावकांच्या सह्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तपासल्याशिवाय फॉर्म रद्द करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

bjp won surat loksabha
Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीचा मुहूर्त ठरला! दिंडोरी, नाशिकचे उमेदवार 29 ला अर्ज भरणार

सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचा उमेदवारी अर्जही अवैध ठरला आणि गुजरातच्या प्रमुख विरोधी पक्षाला शहरातील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले.

त्यांच्या आदेशात, निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितले की, कुंभणी आणि पडसाळ यांनी सादर केलेले चार अर्ज फेटाळण्यात आले कारण प्रथमदर्शनी, प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.