कर्नाटकात तब्बल 'इतक्या' विद्यमान खासदारांचा पत्ता कट; 'चिक्कोडी'तून पुन्हा जोल्ले, हावेरीत बोम्मईंना संधी

भाजपने (BJP) बुधवारी राज्यातील २० मतदारसंघांसह लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
BJP Candidates Loksabha Election
BJP Candidates Loksabha Electionesakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडने दुसरी यादी जाहीर केल्यानंतर विद्यमान खासदारांनी नाराजीचा सूर आळवला आहे.

बंगळूर : भाजपने (BJP) बुधवारी राज्यातील २० मतदारसंघांसह लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा आणि माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्यासह आठ विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात (Chikkodi Loksabha Constituency) आण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle) यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून बेळगाव व कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील उमेदवारांची अजून घोषणा झालेली नाही. दोन्ही मतदारसंघ गुलदस्त्यात ठेवले आहेत. राज्यातील २८ पैकी २० मतदारसंघांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

BJP Candidates Loksabha Election
प्रतीक पाटील लोकसभा लढविणार? जयंत पाटलांनी राजू शेट्टींबाबत व्यक्त केली भीती; म्हणाले, प्रतीक यांना उतरवण्याचा..

यावेळी भाजपने एकूण आठ विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. म्हैसूर-कोडगूचे खासदार प्रताप सिम्हा, बंगळूर उत्तरचे खासदार डी. व्ही. सदानंद गौडा, कोप्पळचे खासदार करडी संगण्णा, हावेरीचे खासदार शिवकुमार उदासी, तुमकूरचे खासदार जी. एस. बसवराजू, मंगळूरचे खासदार नलिनकुमार कटील, चामराजनगरचे खासदार श्रीनिवास प्रसाद, तसेच बळ्ळारीचे खासदार देवेंद्रप्पा यांनी उमेदवारी गमाविली आहे.

BJP Candidates Loksabha Election
Sangli Loksabha : 'स्वाभिमानी' लोकसभा लढल्यास फटका कुणाला? राजू शेट्टींची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

उमेदवारी न मिळाल्‍याने विद्यमान खासदार नाराज

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडने दुसरी यादी जाहीर केल्यानंतर विद्यमान खासदारांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यापैकी कर्नाटकातील २० लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली असून नऊ विद्यमान खासदारांना वगळले आहे.

कर्नाटकातील २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नलिनकुमार कटील (मंगळूर), प्रताप सिम्हा (म्हैसूर), करडी संगण्णा (कोप्पळ), शिवकुमार उदासी (हावेरी), सदानंद गौडा (बंगळूर उत्तर), जी. एस. बसवराज (तुमकूर), देवेंद्रप्पा (बळ्ळारी), जी. एम. सिद्धेश्वर (दावणगेरे) आणि श्रीनिवास प्रसाद (चामराजनगर) यांना उमेदवारी दिली नाही.

मतदारसंघाचे विद्यमान खासदार म्हणून बरीच विकासकामे झाली असली तरी म्हैसूरच्या राजघराण्यातील यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रताप सिम्हा यांना याबाबतचा इशारा मिळाल्याने ते संतापले. पण, यदुवीर वडेयार यांना उमेदवारी दिल्यानंतर ते आता शांत झाले आहेत. तसेच त्यांनी स्वतः यदुवीर यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

BJP Candidates Loksabha Election
Kolhapur Loksabha : 'तुमच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का?' खासदार महाडिकांचं सतेज पाटलांना थेट चॅलेंज

सदानंदगौडांचा अलविदा

दहा वर्षांपासून बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आलेले डी. व्ही. सदानंद गौडा यांनी निवडणुकीच्या राजकारणाला अलविदा केला. आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्याला खासदार म्हणून निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.सदानंदगौडा यांनी आपली नाराजी व्यक्त केली नसली तरी ते मनातून दुखावले असल्याचे समजते. त्यांनी राजकारणातून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती. परंतु त्यांच्या पुढील हालचालीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

ईश्वराप्पा समर्थकांची आज बैठक

माजी मंत्री के. एस. ईश्वारप्पा यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. ईश्वराप्पा यांना लोकसभा निवडणुकीसाठी मुलाला उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्वत: ईश्वराप्पा यांचा मुलगा कांतेश यांना हावेरीची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता भाजप हायकमांडने माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ईश्वरप्पा नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर हावेरी आणि शिमोगा लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांची आज (ता. १४) बैठक बोलावली आहे.

BJP Candidates Loksabha Election
Kolhapur Loksabha : 'कोल्हापूर'मधून मीच शिवसेनेचा उमेदवार असणार; खासदार मंडलिकांनी व्यक्त केला विश्वास

भाजपचे जाहीर उमेदवार असे :

  • चिक्कोडी अण्णासाहेब जोल्ले

  • बागलकोट पी. सी. गद्दीगौडर

  • उडुपी-चिक्कमगळूर कोटा श्रीनिवास पुजारी

  • हावेरी बसवराज बोम्मई

  • विजापूर रमेश जिगजिणगी

  • शिमोगा बी. वाय. राघवेंद्र

  • म्हैसूर यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर

  • बंगळूर ग्रामीण डॉ. सी. एन. मंजुनाथ

  • बंगळूर उत्तर शोभा करंदलाजे

  • बंगळूर दक्षिण तेजस्वी सूर्या

  • बंगळूर मध्य पी. सी. मोहन

  • तुमकूर व्ही. सोमण्णा

  • मंगळूर कॅप्टन ब्रिजेश चौटा

  • चामराजनगर एस. बलराजू

  • धारवाड प्रल्हाद जोशी

  • कोप्पळ डॉ. बसवराज क्यावतूर

  • दावणगेरे गायत्री सिद्धेश्वर

  • बेळ्ळारी बी. श्रीरामुलू

  • गुलबर्गा डॉ. उमेश जाधव

  • बिदर भगवंत खुबा

BJP Candidates Loksabha Election
Sangli : थेट अमित शहांशी कनेक्ट अन् उमेदवारी राखण्यात संजयकाकांना यश; आता कुस्ती विशाल की चंद्रहार पाटलांशी?

नलिनकुमारांची नाराजी नाही

भाजपच्या उमेदवारीपासून वंचित राहिलेले खासदार नलिनकुमार कटील म्हणाले की, कॅप्टन ब्रिजेश चौटा यांची मंगळूरसाठी निवड करण्यात आली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. मी गेली १५ वर्षे खासदार म्हणून काम केले आहे. माझ्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी चोवीस तास काम केले. मतदारसंघासाठी एक लाख कोटी अनुदान मिळवण्यात आपल्याला यश आले. युपीए आणि नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्मच्या कारकिर्दीत मी खूप विकासकामे केली आहेत. नव्या तरुणांनी राजकारणात वावरावे, या उद्देशाने भाजप हायकमांडने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मी तीन वेळा खासदार म्हणून ४.५ वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून, केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()