महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकीय उलथापालथ; काँग्रेस शिवसेनेच्या वाटेवर?

भाजपा आता गोव्यातही ऑपरेशन लोटस राबवणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
congress
congress esakal
Updated on

महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय खलबतांना वेग आलेला आहे. गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा आता तिथेही ऑपरेशन लोटस राबवत असल्याची चिन्हं दिसत आहेत. (Goa Congress News)

congress
देशात ऑपरेशन लोटस? काँग्रेसने राज्यांची यादीच शेअर केली

गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला काँग्रेसचे १० आमदार भाजपात (Bhartiya Janata Party) सामील झाले होते. आज बरोबर तीन वर्षांनंतर याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

congress
मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी; कमलनाथांनी मंत्र्यांकडून मागवले राजीनामे

या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे आता आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत भाजपा ऑपरेशन लोटस (Operation Lotus BJP) राबवणार का या चर्चांना उधाण आलं आहे. आता गोव्यातल्या काँग्रेसची शिवसेना होणार का, याकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()