P. Chidambaram: भाजपची लढण्याची जिद्द ओळखायला हवी; पी. चिदंबरम यांचा विरोधी पक्षांना सल्ला

ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक विषयावर भाष्य केले.
P Chidambaram
P Chidambaramesakal
Updated on

P. Chidambaram: कोलकता: छत्तीसगड आणि राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नुकताच झालेला पराभव अनपेक्षित आणि काळजीची बाब आहे. कोणतीही निवडणूक भाजप शेवटची असल्याप्रमाणे लढतो, हे विरोधी पक्षांनी ओळखायलाच हवे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचे तत्काळ ध्येय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.

माजी केंद्रीय अर्थमंत्री असलेले चिदंबरम म्हणाले, की छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका जिंकल्याने भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी ताकद मिळाली आहे. छत्तीसगड व राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव अनपेक्षित होता. हा निकाल काळजी करण्यासारखा असून पक्षश्रेष्ठी उणिवा दूर करतील, असा विश्वास आहे.

छत्तीसगड, राजस्थानसह मध्य प्रदेश, तेलंगण आदी राज्यांत काँग्रेसने ४० टक्के मतांचा वाटा कायम राखला. शेवटच्या मैलापर्यंतचा प्रचार, बूथ व्यवस्थापन आणि निष्क्रिय मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणणे आदींमधून येत्या लोकसभा निवडणुकीत ही टक्केवारी ४५वर पोचेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या चार राज्यांपैकी तीन राज्यांत काँग्रेसला पराभव पत्करावा लागता तर तेलंगणमध्ये एकमेव यश मिळाले.

P Chidambaram
India Alliance: इंडिया आघाडीत पुन्हा एकदा पेच... अरविंद केजरीवालांच्या भूमिकेमुळे सर्वांना टेन्शन!

ते म्हणाले, की सध्या भाजपच्या गोटात वारे असले तरी वाऱ्याची दिशा बदलू शकते. भाजप कोणतीही निवडणूक कधीही सहजतेने घेत नाही. ती शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे लढतो. विरोधी पक्षांनी भाजपची ही लढण्याची जिद्द ओळखायलाच हवी. ‘इंडिया’ आघाडीने देशातील ४०० ते ४२५ लोकसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध लढू शकणाऱ्या उमेदवारांना ओळखायला हवे. ‘इंडिया’च्या नेत्यांच्या अंतर्गत चर्चेची मला माहिती नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी केवळ तीनच महिने राहिले आहेत, हे ते ओळखतील, याची खात्री आहे.

बेरोजगारी, महागाई महत्त्वाचे मुद्दे-

भाजपच्या ध्रुवीकरण तसेच मुस्लिम, ख्रिश्चनविरोधी प्रचारावर काळजी व्यक्त करत काँग्रेसने भाजपला याबाबतीत चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या अजेंड्यावर असण्याबाबत ते म्हणाले, की हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी तो निर्णायक घटक नाही. या यादीत बेरोजगारी आणि महागाई वरच्या स्थानावर आहे. नोटाबंदी हा जुना मुद्दा झाला असून त्याचे घाव भरले आहेत.

मात्र, काळ्या पैशाच्या जप्तीसंदर्भात आम्ही नोटाबंदीचा मुद्दा पुन:पुन्हा उपस्थित करू. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत १,७६० कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Latest Marathi News)

P Chidambaram
Covid 19 Cases in India: कोरोनाने पुन्हा जोर पकडला, एका दिवसात आढळले 335 नवीन रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.