फडणवीस,पाटील यांची शहांबरोबर खलबते, BMC निवडणूक, मनसे युतीवर चर्चा

फडणवीस,पाटील यांची शहांबरोबर खलबते, BMC निवडणूक, मनसे युतीवर चर्चा
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व दिल्ली दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे तासभर दीर्घ चर्चा केली. प्रस्तावित प्रदेशाध्यक्ष बदल, मुंबई महापालिका निवडणूक यासारखे अनेक दृश्य -अदृश्य मुद्दे बैठकीत चर्चेला आल्याची माहिती आहे.

चंद्रकांत पाटील व भाजप खासदारांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशीही चर्चा केली. फडणवीस व शहा यांच्यात सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहा यांच्या दालनात खलबते झाली. दरम्यान, लोकसभेत आज मांडलेले व राज्यसभेत उद्या (ता. १०) किंवा बुधवारी (ता. ११) येऊ घातलेले १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक, मुंबई महापालिका निवडणूक व त्यातील राज ठाकरे यांच्या मनसे बरोबरची प्रस्तावित युती याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

फडणवीस,पाटील यांची शहांबरोबर खलबते, BMC निवडणूक, मनसे युतीवर चर्चा
मॉल, रेस्टॉरंट, मंदिरं उघडण्याबाबत एकमत, पण...

१२७ व्या घटनादुरुस्तीला संसदेची मंजुरी मिळणार हे स्पष्ट आहे. यामुळे आरक्षण वाढविण्याचे अधिकार थेट राज्यांना मिळतील. भाजपने राज्यसभेत पक्षाच्या खासदारांना दोन्ही दिवस उपस्थित राहणे बंधनकारक करणारा तीन ओळींचा पक्षादेश (व्हीप) आज जारी केला. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने सर्वप्रथम केलेली मराठा आरक्षणाची तरतूद कायम करण्याचे व त्यासाठी एसईबीसीसारखे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार आता राज्यांनाही असतील हे या नव्या घटनादुरूस्तीनंतर निश्चित होईल. हे विधेयक मराठा आरक्षणासंबंधी महत्वाचे असून आता ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर केंद्र सरकार काय भूमिका घेणार हेही यावरील चर्चेतून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. फडणवीस यांनी शहा यांच्याशी या व इतरही मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

फडणवीस,पाटील यांची शहांबरोबर खलबते, BMC निवडणूक, मनसे युतीवर चर्चा
सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

चंद्रकांत पाटील-नड्डा यांची चर्चा

दरम्यान, चंद्रकांत पाटील व राज्यातील खासदारांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही आज दिल्लीत चर्चा केली. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील मजबुतीकरण, लसीकरण मोहिमेबाबतची जनजागृती आदी विविध मुद्दे या बैठकीत चर्चेला आले. पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे हेही आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी आज दुपारी भाजप खासदारांना बोलावून घेण्यात आले होते. तेथेही पाटील यांनी त्यांच्याबरोबर ‘खाने पे’ चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.