Devendra Fadnavis : "मोदी हटाव नाही, परिवार बचाओ…"; पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर फडणवीसांचा टोला

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis sakal
Updated on

भाजप सरकारविरोधात लोकसभा निवडणूत विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून आज पाटणा येथे देशभरातील विरोध एकवटले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलवलेल्या विरोधकांच्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच आपचे नेते अरविंद केजरीवाल सहभागी होत आहेत.

या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह इतर प्रमुख नेते देखील दाखल झाले आहेत. दरम्यान विरोधकांच्या या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले असाच प्रयत्न २०१९ मध्ये केला होता पण काही फायदा झाला नाही, लोक मोदींच्या सोबत आहेत. मोदींच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीए मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Sanjeev Jaiswal : १५ कोटींची एफडी अन् मढ आयलंडला अर्धा एकरचा भूखंड! ईडीच्या छाप्यात IAS अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पाटण्याला होत असलेली बैठक मोदी हटाव नाहीये तर परिवार बचाओ बैठक आहे. सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहील याकरिता सगळे एकत्र आले आहेत. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे.

तर भाजप आणि मोदी यांच्यासाठी ती सेवा आहे. म्हणून येणाऱ्या काळात २०१९ ला यांनी एकत्र येवून पाहिलं, पण जनता मोदींच्या पाठिशी आहे. असे कितीही मेळावे केले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Video : टेलिप्रॉम्पटर मिळाला नाही म्हणून डायरी काढली अन् केली फेकायला सुरवात; काँग्रेसने उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला..

सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तींसोबत चाललेच नाहीत तर त्यांच्या बाजूला बसलेत. सत्तेकरिता आणि परिवार वाचवण्यासाठी सर्व तडजोडी करायला तयार आहेत पण याचा कुठलाही परिणाम होईल असं वाटत नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.