BJP Foundation Day : परिवारवाद, वशंवाद हीच काँग्रेसची ओळख! भाजप वर्धापनदिनी मोदींचा हल्लोबोल!

BJP Foundation Day
BJP Foundation Day
Updated on

BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा स्थापना दिवस आहे. १९८० मध्ये याच दिवशी भाजपची स्थापना झाली होती. भाजपचे पूर्वीचे नाव जनसंघ होते जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाले.

दरम्यान पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षाच्या उभारणीसाठी आणि वाढीसाठी ज्यांनी आपले रक्त दिले त्या महान व्यक्तींना मी नमन करतो, असे मोदी यावेळी म्हणाले.

BJP Foundation Day
Hindu Temple : 'या' देशात पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर लिहिलेल्या भारतविरोधी घोषणा

भारत बजरंगबलीप्रमाणे बलशाली बनत आहे. बजरंबबलीचे जीवन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. देश प्रथम हाच आमचा मुलमंत्र आहे. आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमान जयंती साजरी करत आहोत. आजही हनुमानजींचे जीवन भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर देखील टिका केली. काँग्रेस म्हणजे घराणेशाही आहे. त्यांची संस्कृती आणि विचार लहान आहेत. परिवारवाद, वशंवाद हीच काँग्रसची ओळख असल्याचे मोदी म्हणाले.

BJP Foundation Day
RBI MPC: RBI ने व्याजदरा संदर्भात केली मोठी घोषणा, जाणून घ्या तुमच्या कर्जाचे काय झाले?

नरेंद्र मोदी म्हणाले, आज सर्वत्र बजरंगबलींच्या नावाची घोषणा करत आहेत. त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे. बजरंगबलीप्रमाणे एका महासत्तेप्रमाणे भारताला आपल्यातील सुप्त शक्तींचा साक्षात्कार झाला आहे.

हनुमानजी स्वतःसाठी काहीही करत नाहीत ते सर्व इतरांसाठी करतात. जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते खूप कठोर झाले, त्याचप्रमाणे भारतातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा भाजप कठोर बनते, असे मोदी म्हणाले.

BJP Foundation Day
Karnataka Election : मुस्लिमांचं कोणतंही आरक्षण संपणार नाही; निवडणुकीपूर्वी अमित शहांचं मोठं आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()