भाजपने उत्तर प्रदेशमधील ४० मंत्र्यांना दिले टास्क

उत्तर प्रदेशमधील सत्ता राखण्यासाठी सज्ज होत असलेल्या भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या ४० मंत्र्यांना टास्क दिले आहे.
JP Nadda
JP NaddaSakal
Updated on

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सत्ता राखण्यासाठी सज्ज होत असलेल्या भाजपने (BJP) केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या ४० मंत्र्यांना (Minister) टास्क (Task) दिले आहे. त्यांनी जन आशीर्वाद यात्रांचे आयोजन करावे असा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी दिला आहे. याचा प्रारंभ उत्तर प्रदेशातून होईल. (BJP Gives Tasks to 40 Ministers in Uttar Pradesh)

केंद्रात उत्तर प्रदेशमधील सात मंत्री आहेत. आपल्या मतदारसंघासह तीन ते चार लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि राज्यातील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये ही यात्रा आयोजित करावी असे मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकीसाठी पक्षाची रणनीती भक्कम करण्यासाठी नड्डा खासदारांसह बैठका घेत आहेत. विविध समूहांना त्यासाठी आमंत्रित केले जात आहे.

JP Nadda
ढिलाई नको! ४४ जिल्ह्यांत १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट

जातीचे समीकरण

या महिन्याच्या प्रारंभी उत्तर प्रदेशातील सात मंत्र्यांना केंद्रात संधी मिळाली. पंकज चौधरी, एस. पी. सिंग बघेल, भानुप्रताप सिंह वर्मा, बी. एल. वर्मा, अजय मिश्रा, कौशल किशोर यांच्यासह अपना दलाच्या अनुप्रिया सिंह पटेल मंत्री बनले. यातील प्रत्येकी तीन जण इतर मागासवर्गीय व अनुसूचित जातींमधील आहेत, तर एक जण ब्राह्मण आहे. यामुळे जातीचे समीकरण आपोआप जुळेल.

१६ ऑगस्टपासून प्रारंभ

जन आशीर्वाद यात्रांना १६ ऑगस्टपासून प्रारंभ होईल. कोविड सूचनांचे पालन करून त्याचे आयोजन करावे असेही आवर्जून सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सात मंत्र्यांना राज्यातील खासदारांनी मदत करावी असा आदेशही देण्यात आला. पुढील काही वर्षांत अनेक राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी अशा यात्रांद्वारे भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.