सध्या 30 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुजरातमधील बोताड जिल्ह्यातील (Botad District Gujarat) रोजिद गावात (Rojid Village) बनावट दारू पिऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात दारूबंदी (liquor) असतानाही या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण रुग्णालयात दाखल आहेत.
तर, दुसरीकडं भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) सरकार (BJP Government) सातत्यानं लक्ष ठेवून आहे. सोमवारी सीएम पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिलेत. गुजरात पोलिसांच्या (Gujarat Police) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलंय. गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा देखील तपासात सामील झाले आहेत.'
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 30 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतांश जण भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, या दुर्घटनेचं वृत्त गांधीनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोताडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.