Mamata Banerjee : भाजपचे सरकार लवकरच कोसळेल;ममता बॅनर्जी,आर्थिक लाभासाठी मित्रपक्षांनी सोडले मंत्रिपदावर पाणी

‘‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच कोसळेल. इतर पक्षांना धमकावून ते सत्तेवर आले आहे,’’ अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesakal
Updated on

कोलकता : ‘‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच कोसळेल. इतर पक्षांना धमकावून ते सत्तेवर आले आहे,’’ अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली.

‘हुतात्मा दिना’निमित्त तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांवर टीका केली. आपल्याला आर्थिक लाभ मिळावेत म्हणून केंद्रात सत्तेवर असलेल्या आघाडीतील घटकपक्षांनी मंत्रिपदावर पाणी सोडले, असे त्या म्हणाल्या. नैतिकदृष्ट्या पराभूत झालेल्या भाजपला आम्ही संसदेत पाहून घेऊ, असेही त्या म्हणाल्या.

या मेळाव्याला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव हेही उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘यूपीमध्ये समाजवादी पक्षाने जो ‘खेळ’ केला. त्यामुळे राज्यातील भाजप सरकारने राजीनामा द्यायला हवा होता. परंतु ते निर्लज्ज सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करत सत्तेवर आहे. या यंत्रणांचा वापर करून तुम्ही आम्हाला धमकावू शकत नाही.’’

‘‘केंद्रातील सरकार स्थिर नाही. लवकरच ते कोसळेल. आघाडीतील सर्व सहकारी हावरट आणि भित्रे आहेत.पैशांसाठी कोणी पक्ष विकल्याचे याआधी पाहिले आहे का? त्या सर्वांनी स्वत्व गमावले आहे,’’ असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ‘‘बंगालची अस्मिता आम्ही टिकवून ठेवू. भारताची अस्मिता बंगाल टिकवून ठेवेल. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही. केंद्रीय यंत्रणांचा आणि निवडणूक आयोगाचा गैरवापर करून ते सत्तेवर आले आहेत. फारकाळ ते सत्तेत टिकणार नाहीत.’’

अखिलेश यांनी घेतली ममतांची भेट

कोलकता : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी प.बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसच्या हुतात्मा दिनानिमित्त कोलकत्यात विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यादव यांना या रॅलीचे निमंत्रण देण्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.