गुजरात राज्यसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे; अहमद पटेलांच्या निधानामुळे होती एक जागा रिक्त

BJP holds both Gujarat Rajya Sabha seats; One was vacant due to the demise of Ahmed Patel
BJP holds both Gujarat Rajya Sabha seats; One was vacant due to the demise of Ahmed Patel
Updated on

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत गुजरातमधील दोन्ही जागा भाजपने जिंकल्याने आहेत त्यामुळे वरिष्ठ सभागृहात भाजपचे बळ ९४ पर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची निश्चित असलेली जागा अहमद पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. त्यावरही भाजपाने आपला झेंडा रोवला.

गुजरातमधील या दोन्ही जागा जिंकल्याने भाजपा स्पष्ट बहुमतापासून किमान १४ जागांनी दूर आहे. भाजप आघाडी (एनडीए), अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दलासारख्या मित्रपक्षांचे मिळून येथे स्पष्ट बहुमत झाल्याने नरेंद्र मोदी सरकारची कळीची विधेयके मंजूर करण्यातील आणखी एक अडचण दूर झाली आहे.

भाजपचे दिनशाभाई अननवाडिया आणि रामभाई मोकारिया यांची गुजरातमधून राज्यसभेवर आज निवड झाली. संख्याबळाच्या बाबतीत राज्यसभेत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून त्यांचे ३६ सदस्य आहेत. हे बळ ‘एनडीए’च्या तुलनेत एक तृतीयांशच आहे. राज्यसभेतील हा मुख्य विरोधी पक्ष दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची जागाही वाचवू शकला नाही. त्यांची मुदत २०२३ पर्यंत होती. 

पटेल व भाजपचे अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. गुजरातच्या १८२ सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे १०३ व काँग्रेसचे ६५ आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या विजयात भारतीय आदिवासी पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारासह अपक्ष जिग्नेश मेवानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेसला पुदुच्चेरीतील सत्ता गमवावी लागण्याच्या दिवशीच गुजरातमधून दुसरा झटका बसला.

राज्यसभेतील प्रमुख पक्षांचे बलाबल

भाजप : ९४
काँग्रेस : ३६
तृणमूल काँग्रेस : १२
बिजू जनत दल व अण्णाद्रमुक : प्रत्येकी ९
द्रमुक व टीआरएस : प्रत्येकी ७
वायएसआर काँग्रेस व डावे पक्ष : प्रत्येकी ६
जेडीयू, सप व राजद : प्रत्येकी ५
राष्ट्रवादी काँग्रेस :
राष्ट्रपतीनियुक्त : १२ (पैकी ८ सदस्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.