तब्बल 50 टक्क्यांनी वाढलं भाजपचं उत्पन्न; तुमचं किती वाढलं?

Rahul-Gandhi
Rahul-Gandhi
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपच्या उत्पन्नावरुन टीका केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढल्याच्या एका रिपोर्टचा दाखला देत त्यांनी सत्तारुढ भाजपवर निशाणा साधला आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा केला की, इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून भाजपची कमाई 50 टक्क्यांनी वाढली आहे. यावरुन राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय तसेच सामान्य भारतीयांना त्यांनी प्रश्न केलाय की, तुमचं उत्पन्न किती वाढलंय?

Rahul-Gandhi
प्रत्येकाला लस मिळत नाही तोपर्यंत भारत कोविडमुक्त होणार नाही - एम्स
Rahul-Gandhi
'हिंदू बहुसंख्य असेपर्यंतच संविधानाचं अस्तित्व'

आपल्या ट्विटरवर एका रिपोर्टचा फोटो शेअर करत त्यांनी हा सवाल केला आहे. असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (ADR) चा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, 2019-20 मध्ये भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढलंय. यातील अधिकतर उत्पन्न हे इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून वाढलेलं आहे. काँग्रेस पक्षाने याआधी इलेक्टोरल बाँड्स जारी करण्याचा विरोध केला होता. यामुळे सत्तारुढ पक्षाला मदत होते, असा काँग्रेसचा दावा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.