Haryana Political Crisis : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने दिला राजीनामा

Haryana Cabinet : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला.
 Haryana Cabinet
Haryana CabinetEsakal
Updated on

Haryana Cabinet : देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच सर्वच पक्ष युती, चर्चा सभा, दौरे करत आहेत अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. आता दुपारी एक वाजता शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

भाजपचे पर्यवेक्षक म्हणून अर्जुन मुंडा आणि तरूण चुघ हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

 Haryana Cabinet
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससोबत स्वतंत्र चर्चा सुरु; मल्लिकार्जून खर्गेंना लिहिलं पत्र

हरियाणा विधानसभेचे गणित काय आहे?

हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. सध्या 90 जागांपैकी भाजपकडे 41, काँग्रेसकडे 30, आयएनएलडीकडे 10, एचएलपीकडे एक आणि सात अपक्ष आहेत. हरियाणात 46 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, तेव्हा त्यांनी जेजेपीच्या १० आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीसोबत युती केल्यानंतर दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

 Haryana Cabinet
'हुकूमशाही वृत्तीतून राज्यघटना बदलण्याचे षड्‍यंत्र, हेगडेंची भाजपमधून हकालपट्टी करा'; मुख्यमंत्री आक्रमक

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून युती तुटली आहे. दोन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत समाधानकारक पर्याय न निघाल्याने दोन्ही पक्षांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. भाजप-जेजेपी युती तुटली तरीदेखील त्याचा भाजपवरती मोठा परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे 41 आमदार असून 7 अपक्षही त्यांच्या समर्थनात आहेत. दरम्यान, हलोपाचे आमदार गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळत आहेत.

 Haryana Cabinet
CAA अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, इंडियन युनियन मुस्लिम लीगने दाखल केली याचिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.