JP Nadda : राहुल यांच्याकडून मोदींचा अनेकदा अपमान; भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे खर्गे यांना पत्र

खर्गे यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर नड्डा यांनी आरोपांची सरबत्ती करीत खर्गे यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.
bjp jp nadda write letter to mallikarjun kharge on rahul gandhi controversial statement
bjp jp nadda write letter to mallikarjun kharge on rahul gandhi controversial statementsakal
Updated on

नवी दिल्ली : जातिनिहाय जनगणना व आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकांना भडकवत आहेत. तसेच गांधी यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

खर्गे यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर नड्डा यांनी आरोपांची सरबत्ती करीत खर्गे यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. नड्डा पत्रात म्हणतात की, काँग्रेस व कंपनीने मागील दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी यांना शंभरपेक्षा जास्त अपशब्द वापरले. दुर्दैवाची बाब म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेते यात सामील आहेत. देशाच्या इतिहासात कोणत्याही नेत्याचा अपमान करण्यात आला नाही, तितका अपमान मोदींचा करण्यात आला.

दरम्यान, ‘‘भाजप कायमच द्वेषाचे राजकारण करतो. दहा वर्षांतील केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी अशा घृणास्पद पर्यायाचा वापर पंतप्रधान मोदी करत आहेत,अशी टीका खासदार जयराम रमेश यांनी केली आहे.

राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने दिल्लीतील तीन पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केली आहे. अमेरिका दौऱ्यावर असताना गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केले होते. यावरुन भाजपच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मोहनलाल गिहारा,

शीख विभागाचे सदस्य चरणजीतसिंग लवली तसेच आदिवासी विभागाचे सदस्य सी. एल. मीना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ‘गांधी इतर मागासवर्गीयांना लक्ष्य करीत असून त्यांच्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. असे तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.